विठ्ठल रुक्मिणीच्या पदरात भरभरून दान; आषाढी एकादशीला मंदिराला मिळाले कोट्यवधी रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2025 16:36 IST2025-07-17T16:35:26+5:302025-07-17T16:36:53+5:30

यंदा आषाढी कालावधीत दर्शन रांगेत भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. भाविकांचे सुलभ व जलद दर्शन होण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना मंदिर समितीने केल्या होत्या.

Vitthal Rukmini's image is filled with donations; the temple received crores of rupees on Ashadhi Ekadashi | विठ्ठल रुक्मिणीच्या पदरात भरभरून दान; आषाढी एकादशीला मंदिराला मिळाले कोट्यवधी रुपये

विठ्ठल रुक्मिणीच्या पदरात भरभरून दान; आषाढी एकादशीला मंदिराला मिळाले कोट्यवधी रुपये

आषाढी यात्रा कालावधीत वारकरी भाविकांनी श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या चरणी १० कोटी ८४ लाख रुपयांचे दान केले. तसेच सोन्या-चांदीचे दागिने अर्पण केले आहेत. मंदिर समितीला लाडू प्रसाद, देणगी, भक्त निवास, हुंडीपेटी, श्रींच्या चरणाजवळ आदी विविध देणग्यांच्या माध्यमातून उत्पन्न मिळाल्याची माहिती मंदिरे समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

यंदा आषाढी कालावधीत दर्शन रांगेत भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. भाविकांचे सुलभ व जलद दर्शन होण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना मंदिर समितीने केल्या होत्या. २६ जून ते १० जुलै या कालावधीत भाविकांनी श्रींच्या चरणाजवळ ७५ लाख ५ हजार २९१ रुपये अर्पण. 

२ कोटी ८८ लाख ३३ हजार ५६९ रुपये देणगी, ९४ लाख ४ हजार ३४० रुपये लाडू प्रसाद विक्री, ४५ लाख ४१ हजार ४५८ रुपये भक्तनिवास, १ कोटी ४४ लाख ७१ हजार ३४८ रुपये हुंडीपेटी, ३२ लाख ४५ हजार ६८२ रुपये परिवार देवता तसेच २ कोटी ५९ लाख ६१ हजार ७६८ रुपये सोने-चांदी अर्पण, अगरबत्ती, चंदन खोड, चंदन पावडर, महावस्त्रे. फोटो. मोबाइल लॉकर आदी माध्यमांतून १२ लाख ४५ हजार ७५ रुपये व ३ इलेक्ट्रिक रिक्षा / बसचे ३२ लाख इतके उत्पन्न प्राप्त झाले आहे.

मागील वर्षीचे उत्पन्न...

मागील वर्षी श्रींच्या चरणाजवळ ७७ लाख ६ हजार ६९४ रुपये अर्पण, २ कोटी ६९ लाख २२ हजार ५७८ रुपये देणगी, ९८ लाख ५३ हजार रुपये लाडू प्रसाद विक्री, ५० लाख ६० हजार ४३७ रुपये भक्तनिवास, ९३ लाख ५५ हजार ७३ रुपये हुंडीपेटी, ३१ लाख ७९ हजार ६८ रुपये परिवार देवता तसेच २ कोटी २१ लाख ५३ हजार ६०१ रुपये सोने-चांदी अर्पण, तसेच अगरबत्ती, चंदन खोड, चंदन पावडर, महावस्त्रे, फोटो, मोबाइल लॉकर आदी माध्यमांतून ६ लाख २८ हजार १०९ रुपये उत्पन्न प्राप्त झाले आहे.

मागील वर्षीच्या तुलनेत २ कोटी ३५ लाख ४९ हजार ९७१ इतकी वाढ..

सन २०२४ च्या आषाढी यात्रेत ८ कोटी ४८ लाख ५८ हजार ५६० रुपये व यावर्षीच्या यात्रेत १० कोटी ८४ लाख ८ हजार ५३१ इतके उत्पन्न प्राप्त असून, मागील यात्रेच्या तुलनेत २ कोटी ३५ लाख ४९ हजार ९७१ इतकी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मिळालेल्या या दानातून श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकरी भाविकांना पुरेशा प्रमाणात सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचा मंदिर समितीचा प्रयत्न राहील, असे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी सांगितले.

Web Title: Vitthal Rukmini's image is filled with donations; the temple received crores of rupees on Ashadhi Ekadashi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.