विठ्ठला...महाराष्ट्राला बदनाम करणाºयांना सदबुध्दी दे : सुधीर मुनगंटीवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 14:59 IST2019-01-25T14:58:27+5:302019-01-25T14:59:28+5:30

पंढरपूर : हम नही सुधरेंगे असं काही लोकांनी ठरवून ठेवला आहे, अशामुळे महाराष्ट्राची बदनामी होत आहे, अशा लोकांना सदबुद्धी ...

Vitthal ... Give respect to those who make Maharashtra a disgrace: Sudhir Mungantiwar | विठ्ठला...महाराष्ट्राला बदनाम करणाºयांना सदबुध्दी दे : सुधीर मुनगंटीवार

विठ्ठला...महाराष्ट्राला बदनाम करणाºयांना सदबुध्दी दे : सुधीर मुनगंटीवार

ठळक मुद्दे- अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार सोलापूर जिल्हा दौºयावर- पंढरपूरातील विविध विकास कामांचे करणार उदघाटन- मागील वर्षी २ हजार ८३ कोटी चा सरप्लस बजेट दिले - मुनगंटीवार

पंढरपूर : हम नही सुधरेंगे असं काही लोकांनी ठरवून ठेवला आहे, अशामुळे महाराष्ट्राची बदनामी होत आहे, अशा लोकांना सदबुद्धी दे असे विठ्ठलाकडे साकडे घालणार असल्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

पंढरपूर येथे विविध विकास कामाचे उदघाटन व लोकार्पण सोहळ्यासाठी सुधीर मुनगंटीवार आले होते. याप्रसंगी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पुढे मुनगंटीवार म्हणाले, सरकारच्या तिजोरीमध्ये खडखडाट आहे असे म्हणणाºयांच्या बुद्धीची कीव केली पाहिजे. मागील वर्षी २ हजार ८३ कोटी चा सरप्लस बजेट दिले. त्यास अकाउंट जनरलने मान्यता दिली. याबाबत अर्थसंकल्पात विश्लेषण करण्यात आले होते. परंतु हम नही सुधरेंगे असं काही लोकांनी ठरवून ठेवलेला आहे. यामुळे महाराष्ट्राला काही लोक बदनाम करण्याचे काम करत आहेत. अशा लोकांना विठ्ठलाने सदबुध्दी द्यावी अशी माझी विठ्ठल चरणी प्रार्थना आहे असेही ते म्हणाले.


 

Web Title: Vitthal ... Give respect to those who make Maharashtra a disgrace: Sudhir Mungantiwar