Video - 'मुख्यमंत्री विठ्ठलाच्या महापूजेसाठी येणार नाहीत'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2018 13:38 IST2018-07-22T13:23:12+5:302018-07-22T13:38:37+5:30

पंढरपुरात मराठा समाजाने सहकारमंत्री सुभाष देशमुख आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना घेराव घातला आहे.

Video - .. Then the Chief Minister of Vitthal will not be the chief minister | Video - 'मुख्यमंत्री विठ्ठलाच्या महापूजेसाठी येणार नाहीत'

Video - 'मुख्यमंत्री विठ्ठलाच्या महापूजेसाठी येणार नाहीत'

सोलापूर - पंढरपुरात मराठा समाजाने सहकारमंत्री सुभाष देशमुख आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना घेराव घातला आहे. तसेच कुठल्याही मंत्र्यांना पंढरपुरात फिरकू देणार नसल्याचा इशाराही मराठा आंदोलकांनी दिला आहे. त्यामुळेच मराठा आंदोलकांनी इच्छा नसेल तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विठ्ठलाच्या शासकीय महापूजेला येणार नाहीत, अशी माहिती जलसंपदामंत्री गरिश महाजन यांनी दिली. 

मराठा समाजाने मराठा आरक्षणासाठी तीव्र आंदोनल उभारले आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पंढरपुरातील विठ्ठलाच्या शासकीय महाजपुजेला आंदोलकांनी विरोध केला. तसेच मराठा समाजाच्या तीव्र भावना लक्षात घेता, कुठलाही अनुचित प्रकार घडू नये. त्यामुळे मराठा समाजातील आंदोलकांची इच्छा नसल्यास मी पांडुरंगाच्या महापुजेला येणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे, असे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.  

पाहा व्हिडीओ - 

Web Title: Video - .. Then the Chief Minister of Vitthal will not be the chief minister