Pune News Latest: विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी आलेल्या पंढरपुरात आलेल्या पुण्यातील पाच भाविकांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. अज्ञात तरुणांनी आधी दगड मारले. त्यानंतर भाविकांना बेदम मारहाण केली. यात काही भाविकांचे डोकी फुटली. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहरातून ज्येष्ठ नागरिकांचा एक ग्रुप पंढरपूरला दर्शनासाठी आला होता. मंगळवारी पहाटे पावणे पाच वाजता ते विठ्ठल मंदिर परिसरात होते. त्याचवेळी ही मारहाणीची घटना घडली.
भाविकांना मारहाण का, काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, भाविकांचा ग्रुप विठ्ठल मंदिर परिसरात उभा होता. यावेळी एकजण धक्का मारून गेला. त्यामुळे ग्रुपमधील एकाने विचारले की, असे का केले. त्यानंतर त्याच्यासोबत असलेल्या तरुणांनी त्यांना दगड मारायला सुरूवात केली. काहींना दगड लागले आणि डोकी फुटली. त्यानंतर तरुणांच्या गटाने भाविकांना लाथा बुक्क्यांनीही मारहाण केली.
या घटनेमुळे मंदिर परिसरात पहाटेच गोंधळ उडाला. ही सगळी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी आले. जखमी भाविकांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सीसीटीव्ही फूटेजच्या मदतीने पोलीस हल्ला करणाऱ्या तरुणांचा शोध घेत आहेत.
Web Summary : Five Pune pilgrims were brutally attacked near Vitthal Temple in Pandharpur. Unidentified assailants pelted stones and beat them, causing head injuries. Police are investigating the incident after registering a case and reviewing CCTV footage to identify the attackers.
Web Summary : पंढरपुर में विट्ठल मंदिर के पास पुणे के पांच तीर्थयात्रियों पर बेरहमी से हमला किया गया। अज्ञात हमलावरों ने पथराव किया और पीटा, जिससे सिर में चोटें आईं। पुलिस ने मामला दर्ज कर सीसीटीवी फुटेज की समीक्षा कर हमलावरों की पहचान कर जांच शुरू कर दी है।