वंदे भारत एक्सप्रेस सोलापुरात दाखल; नगरिकांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2023 12:39 IST2023-02-11T12:38:52+5:302023-02-11T12:39:47+5:30

नागरिकांनी ह्या एक्सप्रेसमधून प्रवास केला असून आनंदाचे वातावरण नागरिकांमध्ये दिसून आले.

Vande Bharat Express enters Solapur; Solapurkar's spontaneous response to Vande Bharat Express | वंदे भारत एक्सप्रेस सोलापुरात दाखल; नगरिकांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण

वंदे भारत एक्सप्रेस सोलापुरात दाखल; नगरिकांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा कंदील दाखवला असुन वंदे भारत एक्सप्रेस ही आता नागरिकांच्या सेवेसाठी सुरू झाली आहे. सोलापूर स्टेशन वरती नागरिकांनी वंदे भारत एक्सप्रेसचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत केले. यावेळी सोलापूरकरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा जयघोष ही केला. तर नगरिकांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण दिसून आले.

नागरिकांनी ह्या एक्सप्रेसमधून प्रवास केला असून आनंदाचे वातावरण नागरिकांमध्ये दिसून आले. प्रवास हा आगळा वेगळा असून , ह्या एक्सप्रेस मधील सुविधा देखील चांगल्या आहेत. अश्या पद्धतीच्या रेल्वे आपल्या महाराष्ट्रात सुरू झाल्या आहेत. ह्याचा अभिमान वाटतो. वंदे भारत एक्सप्रेस मधल्या सुविधा इतर रेल्वे गाड्यांमध्ये देखील उपलब्ध झाल्या पाहिजेत तर,जेष्ठ नगरिकांसाठी कुठेतरी सवलती देखील मिळाव्यात अश्या  अपेक्षा नागरीकांनी व्यक्त केल्या.  
 

Web Title: Vande Bharat Express enters Solapur; Solapurkar's spontaneous response to Vande Bharat Express