शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

खेळांच्या मेजवानीने वैष्णवजन तृप्प

By admin | Updated: July 6, 2014 00:23 IST

माऊलींचा रिंगण सोहळा : भाविकांनी केला हरिनामाचा जयजयकार

खेळांच्या मेजवानीने वैष्णवजन तृप्पमाऊलींचा रिंगण सोहळा : भाविकांनी केला हरिनामाचा जयजयकारबाळासाहेब बोचरे ल्ल वेळापूरनाचत जाऊ त्याच्या गावा रे। खेळीया सुख देईल विसावा।।सकाळचे खुडूसचे रिंगण, दुपारचा धावा आणि धाव्यानंतर रंगलेली भारूडे अशी दिवसभर एकामागोमाग एक खेळाची मेजवानी असल्याने वारकऱ्यांचा शीण गेला.खुडूस येथे सकाळचे रिंगण असल्याने खुडूसकरांनी रिंगणाची जागा स्वच्छ केली होती. विस्तीर्ण पटांगणात बहुतांश दिंड्या रिंगणात आल्या होत्या. टाळ, मृदंगाचा अखंड गजर चालू होता. कोवळ्या उन्हात देवाचा खेळ पाहण्यासाठी आजूबाजूच्या खेड्यातील भाविकांनी चांगलीच गर्दी केली होती. पटांगण मोठे असल्याने धावपट्टीही मोठी तयार करण्यात आली होती.सकाळी नऊ वाजता माऊलींची पालखी रिंगणस्थळी आली. पालखी मध्यभागी स्थानापन्न झाल्यावर पालखीला झेंडेकऱ्यांनी कडे केले. रिंगणाच्या धावपट्टीवर अश्व सज्ज ठेवण्यात आले. शिस्तीचा उत्कृष्ट नमुना म्हणून ख्यातकीर्त असलेल्या या सोहळ्यातील चोपदारांनी काही मिनिटांत रिंगण लावून घेतले. बाळासाहेब चोपदार, राजाभाऊ चोपदार रिंगण लावत होते. रामभाऊ चोपदार व उद्धव चोपदार दिंड्या सोडत होते. रिंगणाची तयारी अवघ्या दहा मिनिटांत करण्यात आली. भाविकांचे सहकार्य आणि पोलिसांची मदतही याकामी उपयोगी पडली. पंधराव्या मिनिटाला भोपळे दिंडीच्या जरीपटकाधारीने फेऱ्या मारून औपचारिक सुरूवात केली. शिंगतुतारी आणि टाळ, मृदंगाच्या निनादात अश्वांना दौडीसाठी सोडून देण्यात आले.देहभान हरपलेला वैष्णवांचा मेळा या खेळाकडे डोळे भरून पहात होता आणि तो डोळ्यात साठवत होता. पुढे स्वाराचा अश्व , मागे माऊलींचा अश्व असा हा पाठशिवणीचा खेळ खेळत माऊलींनी स्वाराला कधी मागे टाकले आणि पाहता पाहता चार फेऱ्या पूर्ण केल्या हे कळले देखील नाही. सकाळच्या प्रहरी झालेल्या या खेळाचा वारकऱ्यांनी मनमुराद आनंद लुटला. उडीच्या खेळानंतर सोहळा पुढच्या वाटचालीस मार्गस्थ झाला.---------------------------गेली १३ वर्षे मी पायी वारी करते. चार फेऱ्या मारल्यानंतर माऊलींचा अश्व माझ्याजवळ येऊन थांबला हे पाहून मी फारच भावनावश झाले आणि तिथेच नतमस्तकही झाले. माझ्या दृष्टीने हा अद्भुत योगायोग असला तरी त्यामुळे माझा आनंद गगनात मावेनासा झाला.- प्रतिभाताई पाचपुते----------------------------इंद्रायणीचे पाणी निघाले पंढरपुरीज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात डोक्यावर महादेवाची पिंड घेऊन वारी करणारे उत्तम सर्जेराव चंद्रटिके. औरंगाबाद जिल्ह्यातील गल्लेबोरगावाचे आहेत. इंद्रायणी नदीचे पाणी घेऊन पांडुरंगाच्या चरणी धार घालण्यासाठी वारी करीत आहेत.