शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

मक्यावर अमेरिकन लष्करी अळींचा हल्ला, ऐन दुष्काळात जनावरांच्या चाºयासाठी हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2019 13:08 IST

मोहोळ : तीन वर्षे सातत्याने कमी पाऊस पडल्याने दुष्काळाच्या छायेत असणाºया मोहोळ तालुक्यात चालू वर्षी तर पाऊसच पडला नाही. ...

ठळक मुद्देतीन वर्षे सातत्याने कमी पाऊस पडल्याने दुष्काळाच्या छायेतआता ऐन उन्हाळ्यात जनावरांना वैरणीसाठी काय टाकावे, याची चिंता बळीराजाला सतावत आहेतीन वर्षे मोहोळ तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने तालुका दुष्काळाच्या छायेत वावरत आहे

मोहोळ : तीन वर्षे सातत्याने कमी पाऊस पडल्याने दुष्काळाच्या छायेत असणाºया मोहोळ तालुक्यात चालू वर्षी तर पाऊसच पडला नाही. अशा कठीण परिस्थितीत किमान पशुधन तरी जतन करावे म्हणून शेतकºयांनी खरीप व रब्बी हंगामात मक्याची पेरणी केली. परंतु त्या मक्याच्या पिकावर अमेरिकेत आढळणाºया स्पोडोप्टेरा फु्रगीपपर्डा या अमेरिकन लष्करी अळीने मोहोळ तालुक्यात शिरकाव केला असून, उत्पन्नासह जनावरांच्या वैरणीसाठी केलेले मका पीक पूर्णपणे धोक्यात आले असून, आता ऐन उन्हाळ्यात जनावरांना वैरणीसाठी काय टाकावे, याची चिंता बळीराजाला सतावत आहे.

तीन वर्षे मोहोळ तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी असल्याने तालुका दुष्काळाच्या छायेत वावरत आहे. अशा परिस्थितीत चालू वर्षी तर पाऊसच पडला नाही. त्यामुळे खरीप व रब्बी हंगामासह ऊस पीक धोक्यात आले आहे. ऐन उन्हाळ्यात जनावरांना पिण्याच्या पाण्यासह चाºयाची टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवणार आहे. अशा परिस्थितीत चारा टंचाईवर मात करण्यासाठी रब्बी हंगामात मोहोळ तालुक्यात उत्पादनासाठी म्हणून १,७२१ हेक्टर क्षेत्रावर मक्याची पेरणी करण्यात आली होती. १,९५५ हेक्टर क्षेत्रावर चाºयासाठी मक्याची पेरणी करण्यात आली होती. असे एकूण ३,४६३ हेक्टर क्षेत्रावर मक्याचे पीक लावले होते तर खरीप हंगामात उत्पादन घेण्यासाठी म्हणून १,५८० हेक्टर क्षेत्रावर मक्याची पेरणी करण्यात आली होती. १,८६३ हेक्टर चाºयासाठी म्हणून असे एकूण ३,४६३ हेक्टर क्षेत्रावर तर रब्बी व खरीप धरुन ७,१४२ हेक्टर क्षेत्रावर मक्याची पेरणी करण्यात आली आहे.

हे मक्याचे पीक वाढीस लागले असतानाच गेली दीड महिन्यापासून मोहोळ तालुक्यात अमेरिकेत मका पिकावर आढळणाºया अमेरिकन लष्करी अळीने शिरकाव केल्याने हे मका पीक धोक्यात आले आहे. मका पिकाच्या ताटातच या अळीचे वास्तव्य आढळत असल्याने मक्याची वाढच होत नाही. महागात महागडे असणारे कोराजन हे औषध फवारणी करूनही कीड आटोक्यात आलेली नाही. त्यामुळे अनेक शेतकºयांनी मका पीक काढून टाकले आहे. अनेक ठिकाणी लावलेल्या मकेवर शेतकरी फवारणी करून बेजार झाले आहेत. यामुळे भविष्यात उद्भवणाºया चारा टंचाईला तोंड देत पशुधन कसे जतन करावे, असा मोठा प्रश्न बळीराजा समोर उभारला आहे.

फवारणीचाही उपयोग नाही

  • - आठ एकर क्षेत्रावर ऐंशी हजार रुपये खर्च करुन मक्याचे पीक लावले होते. परंतु एक महिन्यात अमेरिकन लष्करी अळीने या पिकावर अटॅक केल्याने पूर्णपणे पीक धोक्यात आले आहे. 
  • - महागात महाग असणाºया औषधाच्या फवारण्या करूनही या अळीला आळा बसला नाही. आता जनावरांना वैरण कुठून आणावे, असा प्रश्न निर्माण झाल्याचे नामदेव काळे या शेतकºयाने सांगितले.

मका पीक काढून टाकले

  • - आठ हजार रुपये खर्च करून एक एकर क्षेत्रात मक्याची पेरणी केली होती. परंतु अमेरिकन लष्कर अळीने शिरकाव केल्याने मका काढून टाकल्याचे आढेगावचे शेतकरी राजू वाघमारे यांनी सांगितले. मोहोळ येथील सीताराम गुरव यांनी १० हजार रुपये खर्चून केलेल्या दीड एकर मकेत या अळीने पीक धोक्यात आले आहे. 

काय आहे लष्करी अळी

  • - स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डा ही कीड प्रामुख्याने अमेरिकन फॉल आर्मी वर्म या नावाने ओळखली जाते. या किडीसाठी मका हे मुख्य यजमान पीक आहे. तसेच भुईमूग, ऊस, ज्वारी, कापूस, भात यासह ८० पिकांवर ही कीड उपजीविका करू शकते. या किडीच्या प्रसाराचा वेग प्रचंड आहे. आफ्रिकेतील नायजेरिया देशामध्ये २०१६ मध्ये प्रथम आढळलेल्या या किडीने आफ्रिकेतील ४४ देशांमध्ये शिरकाव केला आहे. या किडीने आता राज्यासह जिल्ह्यात व मोहोळ तालुक्यात शिरकाव केल्याने शेतकरी धास्तावला आहे.
टॅग्स :Solapurसोलापूरdroughtदुष्काळagricultureशेतीFarmerशेतकरी