शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
5
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
6
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
7
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
8
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
9
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
10
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
11
आयोग नव्हे, मतदारच राजा !
12
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
13
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
14
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
15
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
16
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
17
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
18
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
19
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
20
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी

उजनीने धरणातील पाणीसाठ्याने ओलांडला १०० टीएमसीचा टप्पा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2018 10:55 IST

उजनी धरणातील पाणीसाठ्याने बुधवारी सायंकाळी १०० टीएमसीचा टप्पा ओलांडला.

ठळक मुद्देउजनी धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढउन्हाळ्यात धरणाची पाणी पातळी वजा २७ टक्क्यांपर्यंत खाली गेली होतीउजनी धरणाचे पाणी कॅनॉलला सोडण्याची मागणी वाढली

सोलापूर / भीमानगर : उजनी धरणातीलपाणीसाठ्याने बुधवारी सायंकाळी १०० टीएमसीचा टप्पा ओलांडला. पुणे जिल्ह्यातून ६० हजार १६५ क्युसेक्सचा विसर्ग सुरू असल्याने धरणातील पाणीसाठा बुधवारी सायंकाळी आठ वाजता ७५ टक्के इतका झाला आहे.मागील महिनाभरापासून पुणे जिल्ह्यातून पाणी उजनी धरणात येत आहे. त्यात सातत्याने वाढच होत असल्याने उजनी धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. बुधवारी सायंकाळी ६ वाजता उजनी धरणातील एकूण पाणीसाठा १००. ७६ टीएमसी इतका झाला होता.

धरणातील  पाणीसाठा सायंकाळी आठ वाजता ७५ टक्क्यांवर पोहोचला होता. पुणे जिल्ह्यातून असाच प्रवाह राहिला तर धरणाचे दरवाजे उचलून नदीत पाणी सोडावे लागणार आहे. यावर्षी उन्हाळ्यात धरणाची पाणी पातळी वजा २७ टक्क्यांपर्यंत खाली गेली होती. ती आता अधिक ७५ टक्क्यांवर  पोहोचली आहे.  म्हणजे धरणात १०० टक्के पाणी आले आहे. 

कॅनॉलला पाणी सोडण्याची गरज- उजनी धरणाचे पाणी कॅनॉलला सोडण्याची मागणी वाढली आहे. दोन वर्षांखाली जिल्ह्यात पाऊस कमी पडला होता. त्यावेळी उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर पाणी कालव्याद्वारे जिल्हाभरात सोडून लहान-मोठे बंधारे, ओढे, ओढ्यावरील बंधारे व काही तलावही भरुन घेतले होते. अशाच पद्धतीने याहीवर्षी कालव्यातून पाणी सोडणे शक्य असेल त्या ठिकाणचे तलाव, बंधारे व ओढ्यावरील बंधारे भरुन घेण्याची मागणी होत आहे. सीना नदीच्या पुढे कारंबा सावळेश्वर जलसेतू परिसरात पाण्याची मागणी होत आहे. 

पुणे जिल्हा धरणातील पाणीसाठा...

  • -पिंपळगाव जोगे- ४५.७८ टक्के
  • -माणिकडोह- ६६.१२ टक्के
  • -येडगाव- ९६.६६ टक्के
  • -वडज-८१.७० टक्के
  • च्डिंभे- ९५.५८ टक्के
  • -घोड- ९२.२७ टक्के
  • -विसापूर- १०.७४ टक्के
  • -कलमोडी- १०० टक्के
  • -चासकमान-१०० टक्के
  • -भामा आसखेड- १०० टक्के
  • -वडीवळे- १०० टक्के
  • -आंध्र- १०० टक्के
  • -पवना- १०० टक्के
  • -कासारसाई-९८.६७ टक्के
  • -मुळशी- १०० टक्के
  • -टेमघर- ६२.७३ टक्के
  • -वरसगाव- १०० टक्के
  • -पानशेत- १०० टक्के
  • -खडकवासला-१०० टक्के 

उपयुक्त पाणी पातळी-  १११९.३७एकूण पाणीसाठा- ७४ टक्केएकूण पाणी- १०३.१८ टीएमसीउपयुक्त  पाणी- ३९.५३ टीएमसी बंडगार्डन विसर्ग  ३६,१७८ क्युसेक्सदौंड विसर्ग ६०,१६५ क्युसेक्स.कालवा विसर्ग २००० क्युसेक्स बोगदा ९०० क्युसेक्स

टॅग्स :SolapurसोलापूरUjine Damउजनी धरणPuneपुणेWaterपाणीFarmerशेतकरी