शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

उजनीचे पाणी आज भवानी पेठ जल केंद्रात पोहोचणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 11:49 IST

ऐतिहासिक नियोजन : मनपाने कारंबा पंपहाउसवर युद्धपातळीवर उभारली यंत्रणा, ४० हून अधिक कर्मचारी कार्यरत

ठळक मुद्देशहराच्या पाणी पुरवठ्यासाठी उजनीचे पाणी हिप्परगा तलावात घेण्याचे नियोजनमनपाच्या वतीने कारंबा शाखा कालव्यावर पंपिंगची यंत्रणा उभारण्यासाठी जिल्हा नियोजन समितीने ५४ लाख रुपयांची तरतूद केलीमहापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने उजनी धरणावरील दुबार पंपिंगची यंत्रणा या ठिकाणी आणली

सोलापूर : उजनी धरणाचे पाणी शनिवारी सायंकाळपर्यंत महापालिकेच्या भवानी पेठ जलशुद्धीकरण केंद्रात पोहोचणार आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने कारंबा शाखा कालव्यावर युद्धपातळीवर यंत्रणा उभारली आहे. याशिवाय कालव्याचे पाणी थेट हिप्परगा तलावात घेण्यासाठी महापालिकेच्या वतीने कारंबा शाखा कालव्यावर पंपिंगची यंत्रणा उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. येत्या दोन दिवसांत उजनीचे पाणी हिप्परगा तलावात पोहोचणार आहे. इतिहासात प्रथमच उजनीचे पाणी हिप्परगा तलावात येणार आहे. 

शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी उजनीचे पाणी हिप्परगा तलावात घेण्याचे नियोजन दोन वर्षांपासून सुरू आहे. मनपाच्या वतीने कारंबा शाखा कालव्यावर पंपिंगची यंत्रणा उभारण्यासाठी जिल्हा नियोजन समितीने ५४ लाख रुपयांची तरतूद केली. मनपाच्या मंगळवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत तातडीने या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. त्यानुसार कारंबा शाखा कालव्यावर पंपिंग यंत्रणा उभारण्याचे काम सुरू झाले आहे. 

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने उजनी धरणावरील दुबार पंपिंगची यंत्रणा या ठिकाणी आणली. कंत्राटदाराकडून पंपिंगची यंत्रणा उभारण्यात येत आहे. कंत्राटदाराचे  २५ कर्मचारी, मनपाचे १० कर्मचारी, चार उपअभियंता, सहायक अभियंता या कामावर लक्ष ठेवून आहेत. पाणी उपसा करण्यासाठी ३० अश्वशक्तीचे चार पंप आणि दहा अश्वशक्तीचे ३० पंप लावण्यात येणार आहेत. 

वीज वितरणासाठी गुरुवारी ट्रान्स्फॉर्मर लावण्यात आला आहे. उजनीचे पाणी गुरुवारी रात्री १० वाजेपर्यंत हिप्परगा तलावाजवळ पोहोचले होते. पंपिंगची कामे करण्यासाठी दोन दिवसांचा  कालावधी लागेल. कालव्यातील पाणी रविवारपासून उपसा  करून हिप्परगा तलावाच्या इनटेकवेलजवळ सोडण्याचा प्रयत्न असल्याचे मनपा आयुक्त दीपक तावरे यांनी सांगितले. इनटेकवेलचे पाणी उताराने थेट भवानी पेठ जलशुद्धीकरण केंद्रात पोहोचणार आहे. उजनीतून सलग २० दिवस पाणी घेण्यात येणार आहे. 

तलावात साडेतीन किलोमीटर चर खोदणार- कालव्यातील पाणी उपसा करुन थेट इनटेकवेलजवळ सोडण्यासाठी हिप्परगा तलावात साडेतीन किलोमीटरची चर खोदण्यात येणार आहे. इनटेकवेलजवळ गाळ साचला आहे. गाळ काढण्यासाठी इनटेकवेलजवळ १३ फूट खोदाई करण्यात येत आहे. त्याची रुंदी दोन्ही बाजूंनी दहा-दहा मीटर असेल, असे पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख संजय धनशेट्टी यांनी सांगितले. चर मारण्याच्या कामासाठी दोन दिवस लागतील. 

मनपा ‘बीपीटी’जवळ कालवा अडविणार

  • - कारंबा शाखा कालव्याच्या हिप्परगा तलावाजवळ दोन वितरिका आहेत. पहिल्या वितरिकेचे पाणी मनपाच्या हिप्परगा तलावाजवळील बे्रक प्रेशर टॅँकजवळ येते. तिथून पुढे शेळगी नाल्याकडे जाते. 
  • - मनपा ब्रिटिश प्रेशर टॅँकजवळ कालवा अडविणार आहे. या ठिकाणी ३० अश्वशक्तीच्या तीन पंपांच्या साहाय्याने पाणी उपसा करुन ब्रेक प्रेशर टॅँकमध्ये सोडले जाईल. बीपीटीतून हे पाणी उताराने थेट भवानी पेठ जलशुद्धीकरण केंद्रात येईल. 
  • - शनिवारी पहाटेपर्यंत पाणी पोहोचणार आहे. सायंकाळपर्यंत ते भवानी पेठ जलशुद्धीकरण केंद्रात पोहोचणार आहे.  
टॅग्स :SolapurसोलापूरUjine Damउजनी धरणwater transportजलवाहतूकSolapur Municipalसोलापूर महानगरपालिका