शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

अरण गावात दोन अनोखे विवाह; काय झाले लग्नावेळी विशेष ते पहा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 2:19 PM

अरणगावातील दोन अनोख्या विवाहांची कहाणी; पाणी, श्रमदान व काटकसर यांचा अनोखा संगम, नवपरिणितांनी केला गाव स्वयंपूर्ण करण्याचा संकल्प

ठळक मुद्देना डामडौल, ना ढोल ! ‘तुफान आलंया’ या स्वरांनी निनादलेली ही मिरवणूक श्रमदानासाठी दाखल होताच तुफान आल्याची जाणीव सर्व श्रमकर्त्यांना झालीबार्शी तालुक्यातील अरणगाव हे शहराजवळचे गाव. परंतु रोजगार निर्मितीसाठी सतत शहराशी संलग्न.भौगोलिकदृष्ट्या ना मोठी नदी, ना तलाव. परिणामी कोरडवाहू शेतीचे प्रमाण ९८ टक्के

कारी : सचिन व प्रियांका झोडगे व दिनेश व नम्रता काजळे या दोघांचा विवाह अरणगाव या गावासाठी आठवणीत राहील, असा ठरला. २३ रोजी या दोघांचे लग्न ठरले होते.

ना डामडौल, ना ढोल ! ‘तुफान आलंया’ या स्वरांनी निनादलेली ही मिरवणूक श्रमदानासाठी दाखल होताच तुफान आल्याची जाणीव सर्व श्रमकर्त्यांना झाली. दोन्ही नवविवाहित जोडप्यांनी श्रमदान करून सर्व गावकºयांचा उत्साह वाढवला. पाणी फाउंडेशनच्या विविध ११ उपसमित्यांच्या माध्यमातून नियोजन आखले जाते. लग्नाचा अथवा जन्माचा वाढदिवस असणारे श्रमदान करणाºयांना अल्पोपहार देतात. गावात तसा फलकच लावला आहे. या उपक्रमातून देणगीसोबतच नवविवाहित वधू व वरांच्या माता-पित्यांनी श्रमदान व पाणी फाउंडेशनसाठी वीस हजार रुपयांची देणगी देऊन कार्याला हातभर लावला आहे.

बार्शी तालुक्यातील अरणगाव हे शहराजवळचे गाव. परंतु रोजगार निर्मितीसाठी सतत शहराशी संलग्न. भौगोलिकदृष्ट्या ना मोठी नदी, ना तलाव. परिणामी कोरडवाहू शेतीचे प्रमाण ९८ टक्के आहे. 

गावची अर्थव्यवस्था शेतीवर असल्यामुळे गावकºयांनी एकत्र येऊन पाणी फउंडेशनच्या वॉटर कपमध्ये सहभाग नोंदणी केली. कामाची सुरुवात केली. रोज २५० लोक श्रमदानाससाठी असतात. बचत गटांचे विशेष सहकार्य, मुले, महिलांचाही सहभाग वाढला आहे. श्रमदानातून तीन हजार घनमीटर काम पूर्ण झाले आहे. आतापर्यंत खोदाईमध्ये झालेल्या कामातून तीन कोटी लिटर पाणी साठविण्याची क्षमता वाढली आहे. 

नवरदेव ठरले ‘वॉटर हिरो’

  • - या दोन्ही नवरदेवांच्या श्रमदानानंतर हळदीचा व विवाह समारंभ पार पडला. दोन ‘वॉटर हिरो’ संकल्पना पुढे आली आहे. अशा अनोख्या विवाह सोहळ्याची चर्चा ग्रामीण भागात रंगली आहे. 
  • च् या दोन्ही नवविवाहित जोडप्यांनी गाव पाणीदार करण्यासोबच काटकसरीने पाणी वापर करून गाव स्वयंपूर्ण करण्याचा संकल्प केला आहे.
टॅग्स :SolapurसोलापूरWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धाWaterपाणीwater shortageपाणीटंचाई