मालट्रकच्या धडकेत सोलापूरचे दोघे ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 14:50 IST2019-06-21T14:46:56+5:302019-06-21T14:50:23+5:30
सोलापूर-हैद्राबाद महामार्गावरील इटकळ येथील घटना

मालट्रकच्या धडकेत सोलापूरचे दोघे ठार
सोलापूर : नळदुर्गहून सोलापूरकडे येत असताना इटकळजवळील धायफुले स्पिनिंग मिलजवळ समोरून येणाºया मालट्रकने दिलेल्या धडकेत सोलापूरचे दोघे ठार झाले. ही घटना गुरुवारी रात्री ९ वाजता घडली.
सचिन विष्णू इरकर (वय २१), किरण काशिनाथ चव्हाण (वय २३ दोघे रा. मुळेगाव तांडा, ता. दक्षिण सोलापूर) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. किरण चव्हाण हा गुरुवारी सकाळी नळदुर्ग येथील सासरवाडीला गेला होता. रात्री पुन्हा दोघे मोटरसायकल (क्र.एम.एच-१३ पीआर-३६५७) वरून सोलापूरच्या दिशेने निघाले होते. दोघे इटकळ येथील धायफुले स्पिनिंग मिलजवळ आले असता, समोरून येणाºया मालट्रक (क्र.एम.एच-१२ एम.व्ही-४४८६) ने जोरात धडक दिली. या धडकेत दोघे गंभीर जखमी झाले, दोघांना सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच मृत्यू झाला. सिव्हिल पोलीस चौकीत नोंद झाली आहे.