शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

सोलापुरात 'कोरोना' मुळे दोघांचा मृत्यू; शुक्रवारी आढळले १३ पॉझिटिव्ह रूग्ण...!

By appasaheb.patil | Published: May 15, 2020 8:31 PM

सोलापुरातील रुग्णसंख्या पोहचली ३४३; आतापर्यंत २४ जणांचा झाला मृत्यू...!

ठळक मुद्देआत्तापर्यंत कोरोना स्वॅब ३८३३ जणांची घेण्यात आली१०५ अहवाल प्राप्त झाले यापैकी ९२ निगेटिव्ह तर १३ पॉझिटिव्ह अहवाल

सोलापूर : कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. सोलापुरात आता ३४३ इतके 'कोरोना' बाधित रुग्ण झाले असून आत्तापर्यंत २४ जणांचा 'कोरोना'मुळे मृत्यू झाला आहे. आज दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. 

आत्तापर्यंत कोरोना स्वॅब ३८३३ जणांची घेण्यात आली. यापैकी ३५३६ अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यात ३२४३ निगेटिव्ह तर ३४३ पॉझिटिव्ह आहेत तर अद्याप २४७ अहवाल प्रलंबित आहेत. 

आज एका दिवसात १०५ अहवाल प्राप्त झाले यापैकी ९२ निगेटिव्ह तर १३ पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत. यात ८ पुरूष आणि ५ महिलांचा समावेश आहे. तर आज ७ जणांना बरं झाल्यानं घरी सोडण्यात आलं. 

आत्तापर्यंत ३४३ पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत. यामध्ये १८८ पुरूष तर १५५ महिला आहेत तर मृत २४ मध्ये १३ पुरूष आणि ११ महिलांचा समावेश आहे. रूग्णालयातून आत्तापर्यंत ११३ जणांना बरं झाल्यानं घरी पाठविण्यात आलं आहे तर रूग्णालयात दाखल असणार्‍यांची संख्या २०६ इतकी आहे.

आज मृत पावलेली व्यक्ती ६३ वर्षीय पुरूष असून नाथसंकुल सिव्हील हॉस्पिटलजवळ येथील रहिवासी आहे. त्यांना १० मे रोजी सिव्हीलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. त्यांचा १५ रोजी मृत्यू झाला तर दुसरी व्यक्ती शास्त्रीनगर महादेव चौक येथील रहिवासी ५८ वर्षीय पुरूष आहे. १२ मे रोजी त्यांना दाखल करण्यात आलं होतं आज सकाळी ते मृत पावले.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस