दुचाकी-कारच्या अपघातात सोलापूरचे दोघे ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 15:02 IST2018-04-03T15:02:19+5:302018-04-03T15:02:19+5:30
सोलापूर -बार्शी रोडवर काळेगाव पाटीजवळील घटना

दुचाकी-कारच्या अपघातात सोलापूरचे दोघे ठार
वैराग : सोलापूर - बार्शी रोडवर दुचाकी व कारची समोरासमोर धडक बसून झालेल्या अपघातात सोलापूर येथील दोघे जागीच ठार झाले. हा अपघात सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास काळेगाव ( ता. बार्शी ) पाटीजवळ घडला.
बाबासाहेब दिलीप गायकवाड ( वय. ३०, रा.पूर्व मंगळवार पेठ, सोलापूर ), अतुल नंदू गाडे ( वय. ३३, रा. सुशिलनगर विजापूर रोड, सोलापूर ) अशी मयत झालेल्या दोघांची नावे आहेत. या अपघाताची नोंद वैराग पोलिसात झाली आहे. या अपघातातील जीप बार्शी वरून सोलापूरकडे जात होती. तर दुचाकीवर बसून सोलापूर कडून बार्शीकडे येणाºया मोटारसायकलला समोरासमोर धडक बसून झालेल्या अपघातात दोघांना आपला जीव गमवावा लागला आहे.
रात्री उशिरा झालेल्या या अपघातास्थळी पोलीस निरीक्षक किरण अवचर, पोलीस बिरुदेव बन्ने यांनी भेट दिली. या अपघातस्थळी रक्त व मांसाचा मोठा सडा पडलेला दिसत होता. दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक किरण अवचर हे करीत आहेत.