विहिरीत बुडून दोन काळविटांचा मृत्यू; पंढरपूर शिवारातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 15:03 IST2019-02-01T14:56:37+5:302019-02-01T15:03:39+5:30
पंढरपूर : आढीव (ता. पंढरपूर) शिवारातील विहिरीत पडल्याने दोन काळविटांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना ३१ ...

विहिरीत बुडून दोन काळविटांचा मृत्यू; पंढरपूर शिवारातील घटना
पंढरपूर : आढीव (ता. पंढरपूर) शिवारातील विहिरीत पडल्याने दोन काळविटांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना ३१ जानेवारी रोजी बाळासाहेब रामचंद्र खाडे (रा. आढीव, ता. पंढरपूर) यांच्या शेतातील विहिरीमध्ये घडली.
पंढरपूर-कुर्डूवाडी रस्त्यावर आढीवकडून बाभूळगावाकडे जाणाºया रस्त्याच्या उजवीकडे २५० फूट अंतरावर खाडे यांची पडीक जमीन आहे. यामध्ये असलेल्या या विहिरीला कठडे नाहीत. रात्रीच्या वेळी मेंढापूर भागातील वनक्षेत्रातील हे काळविट आढीव भागात आले असावेत व या विहिरीत पडल्याने पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला असावा, अशी माहिती वनविभागाकडून देण्यात आली.
सदर काळविटांची उत्तरीय तपासणी घटनास्थळीच डॉक्टरांनी केली आहे. या काळविटांचे वयोमान सव्वातीन ते साडेतीन वर्षे इतके आहे. यात काळविटांना विषबाधा नसल्याचे व शरीरावर जखमा नसल्याचे वन अधिकाºयांनी सांगितले.