शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
3
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
4
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
5
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
6
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
7
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
8
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
9
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
10
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
11
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
12
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
13
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
14
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
15
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
16
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
17
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
18
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
19
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
20
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 

पर्यटनाकडे ओढा; तिरुपती-बालाजीला जातात दररोज ८०० सोलापूरकर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 2:26 PM

ग्रामीण भागातूनही पसंती, अनलॉकनंतर संख्या वाढली, धार्मिक पर्यटनांकडे ओढा वाढला

ठळक मुद्देमागील दोन वर्षांपासून केरळमधील वायनाड, अंदमान निकोबार, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय येथे सोलापूरकर भेट देत आहेतजे नेहमी बाहेर फिरतात त्यांना सतत नवे पाहण्याची इच्छा असते. त्यामुळे आता ईशान्य भारताकडे पर्यटन वाढले आहे.

सोलापूर : धार्मिक पर्यटनासाठीसोलापूर जिल्हा ओळखला जातो. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सध्या धार्मिक स्थळे बंद आहेत; मात्र रोज सुमारे ८०० सोलापूरकर हे तिरुपती बालाजी येथे जात आहेत. लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्यापासून तिरुपती बालाजी येथे जाण्याचे प्रमाण वाढतच आहे. जागतिक पर्यटन दिनाच्या पूर्वसंध्येला ही माहिती मिळाली.

पंढरपूर, अक्कलकोट, तुळजापूर, गाणगापूर ही धार्मिक पर्यटन स्थळे सोलापूरच्या जवळ आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून मागील सात महिन्यांपासून मंदिरे बंद आहेत. यामुळे जिल्ह्यात होणारे धार्मिक पर्यटनही बंद आहे. या परिस्थितीत सोलापूरकर हे तिरुपती बालाजी देवस्थानला जाण्यास पसंती देत आहेत. सोलापूर-हैदराबाद रस्ता चांगला तयार झाला आहे. तर उद्यान एक्स्प्रेसचीही सोय असल्याने सोलापुरातून तिरुपती बालाजी मंदिराचे दर्शन घेणे सोयीचे झाले आहे.

जून महिन्यापासून लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यास सुरुवात झाली. जूनमध्ये रोज २०० भाविक, जुलैमध्ये ५००, आॅगस्टमध्ये ६०० तर सप्टेंबरमध्ये रोज ८०० भाविक जात आहेत. यात जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील भाविकांचाही समावेश आहे. आॅक्टोबर महिन्याचे बुकिंग सुरु झाले असून या महिन्यात अधिक लोक जाण्याची शक्यता असल्याचे सोलापुरातील तिरुमला तिरुपती देवस्थानचे काऊंटर आॅपरेटर सिद्राम उपलंची यांनी सांगितले.

धार्मिक पर्यटनातून निसर्ग पर्यटन शहर व जिल्ह्यामधून अनेक लोक पर्यटनाला जात असतात. साधारणपणे धार्मिक पर्यटनातून निसर्ग पर्यटन करण्याकडे सोलापूरकरांचा ओढा आहे. धार्मिक पर्यटन करताना त्या स्थळाच्या आसपास असलेल्या नैसर्गिक ठिकाणी जाऊन आपला क्षीण घालवण्यास पसंती देतात. एखाद्या धार्मिक ठिकाणी जायचे असेल तर वाटेत येणारे नैसर्गिक स्थळ पाहणे हे जास्त सोयीचे होते. त्यामुळे निसर्ग आणि धार्मिक पर्यटनाचा सुंदर असा मिलाफ घालण्याचा प्रयत्न केला जातो, अशी माहिती टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्यांनी दिली.

सोलापूरकर अष्टविनायक, साडेतीन शक्तीपीठ, गोवा, कोकण, महाबळेश्वर, लोणावळा, कोल्हापूर, गणपती पुळे आदी ठिकाणी जास्त भेटी देतात. मालवण येथे पर्यटनाच्या दृष्टीने चांगली कामे होत असल्याने तिथे देखील लोक जात आहेत. सध्या कोविडमुळे गाड्या जागेवरच थांबल्या आहेत. शासनाने परवानगी दिल्यास पुन्हा एकदा पर्यटन सुरु करता येईल.- जगदीश चडचणकर

मागील दोन वर्षांपासून केरळमधील वायनाड, अंदमान निकोबार, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय येथे सोलापूरकर भेट देत आहेत. जे नेहमी बाहेर फिरतात त्यांना सतत नवे पाहण्याची इच्छा असते. त्यामुळे आता ईशान्य भारताकडे पर्यटन वाढले आहे. सध्या हिमाचल, राजस्थान आणि कर्नाटक येथील पर्यटन क्षेत्र खुले झाले आहे. काही अटींसह तशी परवानगी महाराष्ट्रातही द्यावी.- प्रवीण वैद्य 

टॅग्स :Solapurसोलापूरtourismपर्यटनtirupati balaji mandirतिरुपती बालाजी मंदिर, राजूरघाटrailwayरेल्वे