Truck Two Wheelchair; Death on the spot | ट्रकची दुचाकीस्वाराला धडक; एकाचा जागीच मृत्यू
ट्रकची दुचाकीस्वाराला धडक; एकाचा जागीच मृत्यू

ठळक मुद्दे- अवैध वाळू वाहतुकीचा बळी- सोलापूर जिल्ह्यात अवैध वाळु वाहतुक वाढली- पोलीस घटनास्थळी दाखल, पंचनामा करण्याचे काम सुरू

सोलापूर : अवैध वाळू उपसा करून भरधाव वेगानं जाणाºया ट्रकने दुचाकीस्वारास जोराची धडक दिल्यानं एक जण जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी अक्कलकोट तालुक्यातील सुलेरजवळगे येथे दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली.

या घटनेत निजाम नदाफ (वय ६५ रा. भारत माता नगर मजरेवाडी सोलापूर) असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नांव आहे. याबाबत पोलीसांनी दिलेली प्राथमिक माहिती अशी की, गुरूवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास एमएच १२ डीटी ००६५ क्रमांकाची ट्रक अवैध वाळू घेऊन सोलापूरकडे जात होती़ यावेळी समोरून येणाºया दुचाकीला ट्रकचा जोराचा धक्का लागला़ यात निजाम नदाफ हे ट्रकच्या चाकाखाली चिरडले गेले त्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.

तडवळ भागात गेल्या अनेक दिवसापासून अवैध वाळू वाहतूक आणि व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या अवैध वाळूमाफियांना महसूल आणि ोलिस प्रशासनं बघ्याची भूमिका घेत पाठबळ देत आल्यामुळे गुरूवारी या वाळू वाहतुकीतून निजाम नदाफ हा बळी ठरला असल्याचे बोलले जात आहे. 


Web Title: Truck Two Wheelchair; Death on the spot
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.