नंदेश्वरातील तिहेरी हत्याकांड अमानुष आणि निंदनीय; प्रशांत परिचारकांनी घेतली कुटुंबियांची भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2023 04:59 PM2023-03-01T16:59:57+5:302023-03-01T17:01:19+5:30

याप्रकरणी सखोल चौकशी व मदतीसाठी लवकरच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचेही परिचारक यांनी सांगितले. 

Triple massacre in Nandeshwar inhuman and despicable; Prashant attendants visited the families | नंदेश्वरातील तिहेरी हत्याकांड अमानुष आणि निंदनीय; प्रशांत परिचारकांनी घेतली कुटुंबियांची भेट

नंदेश्वरातील तिहेरी हत्याकांड अमानुष आणि निंदनीय; प्रशांत परिचारकांनी घेतली कुटुंबियांची भेट

googlenewsNext

मल्लिकार्जुन देशमुखे -

मंगळवेढा : मानवतेला आणि सामाजिक एकतेला काळिमा फासणाऱ्या नंदेश्वर येथील तिहेरी हत्याकांडात मृत पावलेल्या माळी कुटुंबियांची पांडुरंग परिवाराचे प्रमुख व माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी भेट घेऊन सांत्वन केले. याप्रकरणी सखोल चौकशी व मदतीसाठी लवकरच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचेही परिचारक यांनी सांगितले. 

अमानुष आणि निंदनीय घटनेचा तीव्र शब्दात निषेध करून संताप व्यक्त केला. संपूर्ण घटनेचा सखोलपणे छडा लागून पीडित माळी कुटुंबास योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून आरोपींना कठोर शिक्षा होण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील असे आमदार प्रशांत परिचारक यांनी सांगितले.

यावेळी धनश्री परिवाराचे प्रमुख प्रा. शिवाजीराव काळुंगे, संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील, व्हा.  तानाजी खरात, संचालक औदुंबर वाडदेकर, संचालक भिवानाना दोलतोडे, युनुसभाई शेख, माजी जि.प.सदस्य नामदेव जानकर, दामाजी शुगरचे माजी संचालक वसंत बंडगर, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बापु गरंडे, माजी उपसरपंच राहुल कसबे आदी मान्यवर उपस्थित होते.
 

Web Title: Triple massacre in Nandeshwar inhuman and despicable; Prashant attendants visited the families

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.