मागच्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी कटर ब्लेडनं वार करुन ठार मारण्याचा प्रयत्न

By दिपक दुपारगुडे | Updated: February 8, 2024 19:40 IST2024-02-08T19:40:01+5:302024-02-08T19:40:25+5:30

फिर्यादीचा भाऊ ग्रामपंचायत सदस्य असल्याने व गावात बहूतानं पाण्याची टाकी मध्यभागी लावण्याचा ठराव मंजूर झाल्याने तो चिडून होता.

Tried to kill with a cutter blade to avenge a previous fight | मागच्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी कटर ब्लेडनं वार करुन ठार मारण्याचा प्रयत्न

मागच्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी कटर ब्लेडनं वार करुन ठार मारण्याचा प्रयत्न

सोलापूर: पूर्वीच्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी गावात सुरु असलेल्या ग्रामसभेच्यावेळी कटर ब्लेडने वार केला आणि डोक्यात मोठा दगड भिरकावून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याबद्दल अविनाश राजू चव्हाण (वय- ३२, रा. बेलाटी) याने चौघांविरुद्ध तक्रार दिली. या प्रकरणी बुधवारी सलगरस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे. भिवाजी वावरे, महादेव वावरे, गजानन वावरे, प्रभू राठोड (रा. बेलाटी, ता. उत्तर सोलापूर) अशी गुन्हा नोंदलेल्यांची नावे आहेत. फिर्यादीत म्हटले आहे की, यातील फिर्यादीची बेलाटी येथे शेती व रांगोळीचा कारखाना आहे. तो चालू ठेवण्यासाठी पैशाची मागणी केली होती ती न दिल्याने तो चिडून होता.

तसेच फिर्यादीचा भाऊ ग्रामपंचायत सदस्य असल्याने व गावात बहूतानं पाण्याची टाकी मध्यभागी लावण्याचा ठराव मंजूर झाल्याने तो चिडून होता. ५ फेब्रुवारी रोजी ग्रामसभेत चिडून फिर्यादीवर कटर ब्लेडने वार करुन जखमी केले. डोक्यात दगड घालून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यानंतर जखमी वर शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येऊन सलगरस्ती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, तपास सपोनि चव्हाण करीत आहेत.

Web Title: Tried to kill with a cutter blade to avenge a previous fight