महापालिका आयुक्त तावरे यांची बदली; पी.शिवशंकर नवे आयुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2020 18:52 IST2020-05-29T18:52:53+5:302020-05-29T18:52:59+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग

महापालिका आयुक्त तावरे यांची बदली; पी.शिवशंकर नवे आयुक्त
सोलापूर : 'काेरोना' रुग्णांच्या वाढत्या संख्येचा फटका प्रशासकीय यंत्रणेला बसला आहे. महापालिका आयुक्त दीपक तावरे यांची बदली झाली असून त्यांच्या जागी वखार महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक पी. शिवशंकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शहरात काेरोनाचे रुग्ण वाढत आहेत. आरोग्य व्यवस्थेचे तीन-तेरा झाले आहेत. जिल्हा प्रशासन आणि महापालिका यांच्या कामाबद्दल वरिष्ठ पातळीवरुन नाराजी व्यक्त केली जात होती. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी शुक्रवारी शहरात आढावा बैठक घेतली. यानंतर सायंकाळी महापालिका आयुक्त तावरे यांची बदली झाल्याचा आदेश नगरविकास खात्याकडून आला.