Transfer of Assistant Police Officers in Solapur Rural Police Force | सोलापूर ग्रामीण पोलिस दलातील सात सहाय्यक पोलिस अधिकाºयांच्या बदल्या

सोलापूर ग्रामीण पोलिस दलातील सात सहाय्यक पोलिस अधिकाºयांच्या बदल्या

सोलापूर : प्रशासकीय कामकाजाच्या दृष्टीने सोलापूर ग्रामीण पोलिस दलातील सात सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, मंद्रुप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक एस. पी. धांडे यांची वाचक १, पांगरीचे एस. ए. हुंदळेकर यांची नियंत्रण कक्ष, कामती पोलिस ठाण्याचे के. टी. उंदरे यांची जिल्हा विशेष शाखा, स्थानिक गुन्हे शाखेचे अतुल भोसले यांची कामती पोलिस ठाणे, अकलूज पोलिस ठाण्याचे सुधीर तोरडमल याची पांगरी पोलिस ठाणे तर बार्शी शहरातील शिवाजी जायपत्रे यांची बार्शी तालुका पोलिस ठाण्यात बदली करण्यात आल्याचे पत्र सोलापूर ग्रामीण पोलिस दलाचे पोलिस अधिक्षक मनोज पाटील यांनी काढले. बदली करण्यात आलेल्या अधिकाºयांची प्रभारी म्हणून तात्काळ पदभार स्वीकारावा असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.

Web Title: Transfer of Assistant Police Officers in Solapur Rural Police Force

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.