सोलापूर : पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे गावात महादेवाच्या मंदिरात पूजेसाठी गेलेले तीन साधू गावात पूर आल्याने मंदिरात अडकलेले आहेत. त्यांना बाहेर काढण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची टीम गुरसाळे गावात पोहचत असल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण विभागाने दिली.
दरम्यान, माळशिरस तालुक्यातील कुरबावी गावात पुराच्या पाण्यात ६ नागरिक अडकले होते. इंदापूर येथे NDRF ची टीम आलेली होती. तीच टीम कुरबावी गावात येऊन पहाटे साडेतीन वाजता सहा नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.
गेल्या दोन दिवसापासून सोलापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे नदी, नाल्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने काही मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. भीमा काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.