विषारी औषध प्यायल्याने तीन जर्शी गायींचा तडफडून मृत्यू; सोलापुरातील घटना

By Appasaheb.patil | Updated: August 18, 2023 14:11 IST2023-08-18T14:11:19+5:302023-08-18T14:11:56+5:30

दरम्यान, फिर्यादी देशमुख यांनी तातडीने खासगी डॉक्टर बोंगे यांना बोलाविले होते, डॉक्टरांनी जनावरांची तपासणी केली असता एक गाय मृत झाल्याचे सांगितले, त्यानंतर उपचार चालू असताना दोन गायींचा मृत्यू झाला.

Three Jersey cows died after drinking poison; Incident in Solapur | विषारी औषध प्यायल्याने तीन जर्शी गायींचा तडफडून मृत्यू; सोलापुरातील घटना

विषारी औषध प्यायल्याने तीन जर्शी गायींचा तडफडून मृत्यू; सोलापुरातील घटना

सोलापूर : विषारी औषध प्यायल्याने तीन जर्शी गायींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचीघटना बीबीदारफळ (ता. उ. सोलापूर) येथे १८ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळच्या सुमारास पोलिसात नोंद झाली. संजय जयसिंग देशमुख (वय ५४) यानी दिलेल्या फिर्यादीनुसार दीपक संजयसिंग देशमुख (वय ३०), तुषार दीपक देशमुख (वय ३२) या दोघांविरोधात सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, फिर्यादी संजय देशमुख हे शेतातील द्राक्ष बाग काढून टाकत होते. याचवेळी चारण्यासाठी बागेत चार जर्शी गायी बांधल्या होत्या. सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास फिर्यादी हे शेतात बांधलेल्या गायी सोडून गोठ्याकडे जात असताना शेतातील बांधावर भाऊ दीपक व तुषार यानी प्लास्टिक बॅरलमध्ये कोणतेतरी विषारी औषध पाण्यामध्ये भिजत ठेवलेले होते, याच बॅरलमधील विषारी औषध प्यायल्याने गायी चक्कर येऊन खाली पडल्या.

दरम्यान, फिर्यादी देशमुख यांनी तातडीने खासगी डॉक्टर बोंगे यांना बोलाविले होते, डॉक्टरांनी जनावरांची तपासणी केली असता एक गाय मृत झाल्याचे सांगितले, त्यानंतर उपचार चालू असताना दोन गायींचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद सोलापूर तालुका पेालिस ठाण्यात झाली असून पुढील तपास हेडकॉन्स्टेबल महिंद्रकर करीत आहेत.

Web Title: Three Jersey cows died after drinking poison; Incident in Solapur