करकंबमध्ये तीन ठिकाणी दरोडा; एकाच कुटुंबातील पाच जणांना चोरट्यांनी केली मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 14:31 IST2019-02-25T14:30:30+5:302019-02-25T14:31:21+5:30
करकंब : करकंब (ता. पंढरपूर) येथील टेंभुर्णी रोड व्यवहारे वस्ती येथे सोमवारी पहाटेच्या सुमारास रहिमान इस्माईल कोरबू, अशोक गजेंद्र ...

करकंबमध्ये तीन ठिकाणी दरोडा; एकाच कुटुंबातील पाच जणांना चोरट्यांनी केली मारहाण
करकंब : करकंब (ता. पंढरपूर) येथील टेंभुर्णी रोड व्यवहारे वस्ती येथे सोमवारी पहाटेच्या सुमारास रहिमान इस्माईल कोरबू, अशोक गजेंद्र शेटे तसेच अनिल अंकुश धायगुडे या वेगवेगळ्या तीन कुटुंबांच्या घरी अज्ञात चोरट्यांनी दरोडा टाकला. यात अनिल घायगुडे यांच्यासह पत्नी अश्विनी धायगुडे व आई विमल धायगुडे यांना गंभीर स्वरूपाची मारहाण केली असल्याची घटना घडली आहे.
याबाबातची सविस्तर माहिती अशी की टेंभुर्णी - पंढरपूर रोडवरील व्यवहारे पाटीच्या दरम्यान वरील तिन्ही कुटुंबे एकमेकांपासून दीड ते दोन किलोमीटरच्या अंतरावर वास्तव्यास आहेत. यातील रहिमान कोरबू यांच्या घरी रात्रीच्या सुमारास घरातील सर्वजण एका खोलीत झोपलेले असताना दुसºया खोलीचे कडी कोयंडा उचकटुन एक तोळा सोन्याचे नेकलेस, गलसर आणि दीड तोळे सोन्याचे घंटन असे एकूण साडेतीन तोळे सोन्यासह रोख १५ हजार रुपये असा एकूण ६७ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला, तसेच अशोक गजेंद्र शेटे यांच्या घरातील १ तोळे सोन्यासह ५ हजार रुपये रोख रक्कम असा एकूण ३५ हजार रु किंमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला आहे.
पुढे चोरट्यांनी आपला मोर्चा अनिल अंकुश धायगुडे यांच्या घराकडे वळवून यांच्यासह घरातील त्यांच्या आई विमल धायगुडे, पत्नी अश्विनी धायगुडे यांना धारदार शस्त्राने मारहाण करून जखमी केले़ वरील तिघांनाही करकंब येथे प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी सोलापूर येथे हलवले आहे. घटनास्थळी करकंब पोलीसांसह, मोबाईल फॉरेन्सिक लॅब, श्वानपथक आणि आय बाइक अशी विविध पथके दाखल झाली आहेत़