शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

४० दिवसांत ३,६०,००० रुपयांचं उत्पन्न; सोलापूरच्या शेतकऱ्यानं 'असा' केला चमत्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2020 12:47 IST

कमी कालावधी, कमी क्षेत्रात कलिंगडामधून घेतले जास्त उत्पन्न; एक एकर पाच गुंठ्यात ४० टन उत्पादन अन् तीन लाख ६० हजार रुपये कमविले.

ठळक मुद्देपाणी अन् कष्टाची जोड असली की त्यातूनही सोने पिकते केवळ सहा एकर शेतजमीन आहे़ याच क्षेत्रावर अनेक पिकांचे वेगवेगळे प्रयोगस्थानिक बाजारपेठ निवडण्याऐवजी थेट गुजरातच्या बाजारापेठेत कलिंगड विक्रीसाठी पाठविले़

प्रभू पुजारी

सोलापूर : घरची परिस्थिती बऱ्यापैकी. पण शेती करण्याची आवड... इतकेच नव्हे तर शेतीत नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून कमी क्षेत्रात, कमी कालावधीत जास्त उत्पन्न कसे घेता येईल, यासाठी प्रयत्न सुरू असतो. त्यातून ही किमया साधली आहे कोरवली (ता. मोहोळ) येथील शेतकरी रेवणसिद्ध गुरुसिद्ध कोरे यांनी त्यांनी केवळ एक एकर पाच गुंठे क्षेत्रात कलिंगडामधून तब्बल ३ लाख ६० हजार रुपयांचे उत्पन्न घेतले आहे.

शेतजमीन मध्यम स्वरुपाची असली तरी त्याला पाणी अन् कष्टाची जोड असली की त्यातूनही सोने पिकते, असे म्हटले जाते. ही उक्ती रेवणसिद्ध कोरे यांनी तंतोतंत आचरणात आणली आहे. कोरवली येथे त्यांची केवळ सहा एकर शेतजमीन आहे. याच क्षेत्रावर त्यांनी अनेक पिकांचे वेगवेगळे प्रयोग केले आणि ते यशस्वीही झाले आहेत.

यावर्षी दोन महिन्यापूर्वी शेतीची मशागत करून एकरी दोन ट्रॉली म्हणजेच २० टन शेणखत टाकले. त्यानंतर ६ फूट अंतराचे बेड तयार केले. त्यावर मल्चिंग पेपर अंथरुण ठिबक सिंचन केले़ त्यानंतर दीड फूट अंतरावर एक कलिंगडाचे रोप याप्रमाणे ६ हजार रोपांची लागवड केली. ८ ते १० दिवसांच्या अंतराने खतांची मात्रा, योग्य वेळी पाणी आणि रासायनिक  खते व औषधांची मात्रा दिली. त्यामुळे केवळ दोन महिन्यातच कलिंगड बाजारात विक्रीसाठी आले.

त्यानंतर त्यांनी स्थानिक बाजारपेठ निवडण्याऐवजी थेट गुजरातच्या बाजारापेठेत कलिंगड विक्रीसाठी पाठविले. त्या ठिकाणी विक्रीसाठी जाण्यास खर्च जास्त होत असला तरी जास्त दर मिळत आहे. शिवाय हे कलिंगड गुजरातमधील नागरिक चवीने खातात.

यासाठी आनंद शिंदे, जाकीर शेख, मुजावर शेख यांचे मार्गदर्शन लाभले. योग्य नियोजन आणि मार्गदर्शनामुळे यावर्षी विक्रमी उत्पादन घेण्यात यश आले. कलिंगड हे कमी कालावधीत जास्त उत्पादन मिळवून देणारे पीक आहे. ते घेण्यात यशस्वी झाल्याचे रेवणसिद्ध कोरे यांनी सांगितले.

मुलगा अमेरिकेत शास्त्रज्ञ- रेवणसिद्ध कोरे सांगत होते, दोन मुले आणि एक मुलगी आहे़ एक मुलगा अमेरिकेत शास्त्रज्ञ तर एक शिक्षक आहे़ मुलगीही उच्चशिक्षित आहे़ शेतकरी असूनही मुलांना शिक्षण घेताना कशाचीही कमतरता पडू दिली नाही़ यासाठी अपार कष्ट घेतले. मुलांनीही माझ्या कष्टाची जाणीव ठेवत उच्च शिक्षण घेत नोकरी करीत आहेत, यापेक्षा दुसरा आनंद नाही, असे त्यांनी सांगितले.

अनेक जण मुले नोकरीला असले की निवांत राहणे पसंत करतात़ माझीही मुले नोकरीला आहेत, पण मला पूर्वीपासूनच शेतीत कष्ट करण्याची सवय आहे़ शिवाय शेतात नवनवीन प्रयोग करण्याची आवड आहे़ त्यातून हे शक्य झाले़- रेवणसिद्ध कोरे, कलिंगड उत्पादक शेतकरी, कोरवली

टॅग्स :FarmerशेतकरीSolapurसोलापूरAPMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीGujaratगुजरातagricultureशेती