शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

हजारोंनी अनुभवला तुकोबांचा रिंगण सोहळा

By admin | Updated: July 6, 2014 01:25 IST

पहिले उभे रिंगण : जगद्गुरूंचा सर्वत्र जयघोष

 श्रीपूर: माळीनगर (ता. माळशिरस) येथे जगद्गुरू श्रीसंत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात विठुराया आणि तुकोबारायांच्या जयजयकारात पहिला उभा रिंगण सोहळा झाला. दोन्ही अश्वस्वारांचा समन्वय मात्र या रिंगण सोहळ्यात दिसून आला नाही.अकलूजचा मुक्काम पूर्ण करून तुकाराम महाराजांची पालखी शनिवारी माळीनगरमध्ये दाखल झाली. प्रथमच माळीनगर ग्रामपंचायतीने स्वागत केले. यावेळी उपसरपंच महादेव बंडगर, सदस्य लक्ष्मण डोईफोडे, बाळासाहेब वजाळे, संग्राम भोसले, अंकुश फुले, नीलेश एकतपुरे, आशा सावंत, वंदना तुपसौंदर्य, पिसे उपस्थित होते. माळी शुगर्सतर्फे कारखान्याचे वसंत ताम्हाणे, उपाध्यक्ष विलास इनामके, परेश राऊत, शुगरकेन सोसायटीचे अध्यक्ष सुरेश राऊत, उपाध्यक्ष सुबोध गिरमे यांनी स्वागत केले.श्रीसंत तुकाराम महाराज पालखी सोहळा माळीनगरमध्ये सकाळी ८.३० वाजता दाखल झाला. सर्वत्र उभे रिंगण होणार की नाही, याची सर्वांना उत्सुकता होती. शुक्रवारी अकलूजमध्ये गोल रिंगण करताना ३० वर्षांपासून धावत असणारा अश्व रिंगण न करताच निघून गेला होता. त्यामुळे येथील रिंगण होणार की नाही, याची चर्चा रंगली होती.सकाळपासून कडक ऊन पडल्यामुळे उकाडा जाणवत होता. अश्वस्वारांमध्ये समन्वय नसल्याने उभ्या रिंगणास उशीर होत होता. पालखी सोहळ्याचा अश्व प्रथम धावल्यानंतर मोहिते-पाटील यांचे दोन्ही अश्व धावतात, परंतु पहिल्या रिंगणाला धावलाच नाही, नंतर त्यातील एक अश्व विरूद्ध दिशेने धावत गेल्याने पालखीचा अश्व व मोहिते-पाटील यांचा अश्व एकमेकांसमोर आल्यामुळे दोन्ही अश्व बिथरले आणि रिंगण सोडून बाहेर जाऊ लागले. त्यानंतर रिंगण सोहळा झाला. भाविकांचा उत्साह अपूर्व होता.