सोलापूरातील भीमा पाटबंधारे कार्यालयात शेतकºयांचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2018 02:23 PM2018-04-05T14:23:08+5:302018-04-05T14:23:08+5:30

कुरूल वितरिकेच्या २३ नं. फाट्याला पाणी सोडण्याची मागणी, अधिकाºयांची उडवाउडवीची उत्तरे

Thousands of farmers in the Bhima Patbandar office in Solapur | सोलापूरातील भीमा पाटबंधारे कार्यालयात शेतकºयांचा ठिय्या

सोलापूरातील भीमा पाटबंधारे कार्यालयात शेतकºयांचा ठिय्या

googlenewsNext
ठळक मुद्देउजनी धरणातून कुरूल वितरिकेत गेल्या आठ दिवसांपासून पाणी सोडलेमंद्रुप परिसरातील २३ नंबर फाट्याला पाणीच सोडण्यात आले नाहीशेतकºयांनी कार्यालयाच्या पायºयांवर ठिय्या मारला

सोलापूर : कुरूल वितरिकेच्या २३ नंबर फाट्याला पाणी सोडण्याच्या मागणीसाठी मंद्रुप येथील शेतकºयांनी बुधवारी दिवसभर होटगी रोडवरील जलसंपदा विभागाच्या भीमा पाटबंधारे कार्यालयात ठिय्या मारला तरी शेतकºयांच्या मागणीकडे संबंधित अधिकाºयांनी दुर्लक्ष केले.

उजनी धरणातून कुरूल वितरिकेत गेल्या आठ दिवसांपासून पाणी सोडले आहे. मंगळवारपासून टप्प्याटप्प्याने हे पाणी बंद करण्यात आले. यात मंद्रुप परिसरातील २३ नंबर फाट्याला पाणीच सोडण्यात आले नाही. याबाबत संबंधित शेतकºयांनी पाटकºयास विनंती केली तरी त्याने उद्धटपणे उत्तरे देऊन पाणी बंद केले. त्यामुळे संतापलेले शेतकरी अखिल भारतीय किसान सभेचे डॉ. शिवानंद झळके, शेतकरी संघटनेचे मेहमूद पटेल, बिळेणसिद्ध सुंटे, पंचायत समिती सदस्य अमृत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जलसंपदा कार्यालयात जमा झाले. या शेतकºयांनी कार्यकारी अभियंता जोशी यांची भेट घेऊन कैफियत मांडली.

त्यावर जोशी यांनी या शेतकºयांना जलसंपदा कार्यालय क्र. २ मधील कार्यकारी अभियंता हरसूर यांना भेटण्यास सांगितले. त्याप्रमाणे हे सर्व शेतकरी होटगी रस्त्यावरील जलसंपदा कार्यालय क्र. २ मध्ये आले, पण कार्यालयात हरसूर नव्हते.  भ्रमणध्वनीवरून संपर्क साधल्यावर त्यांनी या खेपेस पाणी सोडणे शक्य नाही, पुढील पाळीस विचार करू, असे उत्तर दिले. त्यावर संबंधित शेतकºयांनी तुम्ही कार्यालयात या आपण चर्चा करू अशी विनंती केल्यावर येतो, असे त्यांनी उत्तर दिले. त्यांची वाट पाहत बुधवार रात्री उशिरापर्यंत शेतकरी कार्यालयात ठाण मांडून होते. 

कर्मचारी कार्यालय बंद करून गेले तरी हे शेतकरी कार्यालयासमोर बसून होते. कार्यकारी अभियंता   हरसूर यांनी येऊन निवेदन स्वीकारावे असा त्यांचा हट्ट होता. याची  माहिती मिळाल्यावर विजापूरनाका पोलिसांनी तेथे धाव घेतली.  त्यावेळी शेतकºयांनी निवेदन घेण्यास कोणी आले नसल्याची तक्रार केली. शेवटी पोलिसांनी समजूत काढून रात्री उशिरा त्यांना सोडून दिले. 

शेतकरी संतप्त.......
कैफियत ऐकून घेण्यास कोणीच तयार नाही व निवेदन कोणी घेत नाही, असे पाहून शेतकºयांनी कार्यालयाच्या पायºयांवर ठिय्या मारला. कोण म्हणतंय देत नाही, पाणी आमच्या हक्काचे, उजनीचे पाणी घेतल्याशिवाय आम्ही सोडणार नाही, अशी घोषणाबाजी केली. पण शेतकºयांच्या व्यथेकडे कर्मचाºयांनी लक्ष दिले नाही. जलसंपदाच्या अधिकाºयांच्या आडमुठे भूमिकेविषयी शेतकरी सुकुमार साठे, संतोष साठे, रोहित हजारे यांनी तीव्र भावना मांडल्या.

अधीक्षकांचेही दुर्लक्ष
- जलसंपदा कार्यालयात शेतकरी ठाण मांडून बसल्यावरही अधिकाºयांनी दुर्लक्ष केल्याबद्दल अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांना माहिती देण्यात आली. त्यांनी पाटबंधारे अधीक्षक शिवाजी चौगुले यांना याबाबत लक्ष घालण्याबाबत सांगतो असा निरोप दिला पण पाटबंधारे कार्यालयाकडून कोणताचा प्रतिसाद मिळाला नाही. 

Web Title: Thousands of farmers in the Bhima Patbandar office in Solapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.