दुकानातील खाद्य पदार्थांचा आस्वाद घेत चोरांनी केली चोरी

By रूपेश हेळवे | Updated: November 7, 2022 16:46 IST2022-11-07T16:45:54+5:302022-11-07T16:46:45+5:30

दोन चोरांनी कुंभार वेस मधील उदगीर गल्ली मधील तीन दुकाने चोरट्यांनी फोडले. ही घटना सोमवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडली.

Thieves stole the food while enjoying the food in the shop | दुकानातील खाद्य पदार्थांचा आस्वाद घेत चोरांनी केली चोरी

दुकानातील खाद्य पदार्थांचा आस्वाद घेत चोरांनी केली चोरी

सोलापूर : दोन चोरांनी कुंभार वेस मधील उदगीर गल्ली मधील तीन दुकाने चोरट्यांनी फोडले. ही घटना सोमवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडली. चोरी करताना चोरांनी स्वीट मार्ट मधील खाद्य पदार्थांचाही अस्वाद घेतला, ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

सोमवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास दोन चोर हातात स्क्रू ड्राव्हरच्या सहाय्याने कपड्यांचे, स्वीट मार्ट अन्य एक दुकानाचे शटर उचकटून दुकानात प्रवेश केले. त्यात कपड्यांच्या दुकानातील जवळपास वीस ते तीस हजार रुपये चोरल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. तर स्वीट मार्ट मधील चिल्लर पैशांवर चोरांनी डल्ला मारला.

यावेळी त्यांनी दुकानातील कुंदा, बर्फी, जिलेबी, लाडूवरही ताव मारला. शेवटी जाताना त्यांनी दुकानातीलच पाणी पिऊन गेले. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. दरम्यान, मध्यवर्ती भागात चोरी वाढत असल्यामुळे परीसरात पोलीसांनी बंदोबस्त वाढवावे असे मत व्यापार्यांनी व्यक्त केले.

Web Title: Thieves stole the food while enjoying the food in the shop