Thieves challenge Mandrup police; Thieves broke into an automobile shop | मंद्रुप पोलिसांना चोरट्यांचे आव्हान; ऑटोमोबाईलचे दुकान चोरट्यांनी फोडले

मंद्रुप पोलिसांना चोरट्यांचे आव्हान; ऑटोमोबाईलचे दुकान चोरट्यांनी फोडले

ठळक मुद्देदक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप येथे चोरीऑटोमोबाईलचे दुकान फोडून साहित्य नेले चोरूनशटर निघाल्यामुळे टायर दुकानमधील चोरी थांबली

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथील कोरे पेट्रोल पंपाजवळ असलेले सलगरे यांचे ऑटोमोबाईल दुकान चोरट्यांनी फोडले.


मागील महिन्यातच मंद्रुपमध्ये नऊ दुकान फोडले होते,  तेच चोरटे पुन्हा आज मंद्रुपमधील दुकान फोडले. मागील  पद्धतीने कॅमेरा फोडून शटर उचकटून चोरट्यांनी दुकान फोडले.  दुकान फोडून दुकानातील टायर व रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केला, त्याच शेजारी असलेले एक टायर दुकान फोडण्याचा प्रयत्न केला परंतु त्या दुकानाचे शटर उचलल्या नसल्यामुळे ते सोडून चोरटे पसार झाले.

या घटनेची माहिती मिळताच मंद्रूप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. सातत्याने होत असलेल्या चोऱ्यांमुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Web Title: Thieves challenge Mandrup police; Thieves broke into an automobile shop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.