विठ्ठल मंदिरातील दानपेटी भरल्याचं पाहून चोराचे डोळे चमकले; बघा, पुढे काय घडले!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2019 12:06 IST2019-09-04T12:02:58+5:302019-09-04T12:06:56+5:30
दक्षिणा पेटी भरल्याने पैसे वर आले होते. ते काढण्यात चोरट्याला एकदा यश आलं.

विठ्ठल मंदिरातील दानपेटी भरल्याचं पाहून चोराचे डोळे चमकले; बघा, पुढे काय घडले!
पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात नेहमीच भाविकांची गर्दी असते. येणारा भाविक शेतकरी, कष्टकरी,कामगार असल्याने तो आपल्या इच्छेप्रमाणे दानपेटीत देणगी टाकतो. परंतु एका चोराने दानपेटी भरत असल्याचे लक्षात येताच हात घालून पैसे काढीत होता. हे दृश्य सीसीटीव्हीत दिसत होते. त्यामुळे तो रंगेहाथ सापडला.
गौरी गणपती उत्सवामुळे पंढरपूर श्री विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या जास्त आहे. त्यामुळे दानपेट्या लवकरच भरून जातात. अशा भरलेल्या दानपेटीत दान टाकण्याचं नाटक करत हा चोर हात घालून पैसे चोरून घेत असल्याचे उघड झाले. मंगळवारी दुपारी विठ्ठल- रूक्मिणी मंदिरातील व्यंकटेश मंदिरात संतोष नाना मोरे हा सहा वेळा दक्षिणा पेटीतून पैसे चोरल्याचे पोलिस कॉन्स्टेबल वामन यलमार यांच्या लक्षात आले. पोलीस यलमार यांनी सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता तब्बल सहा वेळा दक्षिणा पेटीतून पैसे चोरल्याचे त्यांना आढळून आले.
दक्षिणा पेटी भरल्याने पैसे वर आले होते. एकदा चोरट्याला यश आल्यावर त्याने वारंवार हा प्रयोग केला. पैसे चोरता येतात हे कळाल्याने चोराला मोह आवरला नाही व चोरटा परत एकदा चोरी करायला आल्यानंतर पोलिस कॉन्स्टेबल वामन यलमार यांनी त्याला रंगेहाथ पकडले.