शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
4
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
5
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
6
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
7
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
8
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
9
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
10
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
11
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
12
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
13
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
14
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
15
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
16
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
17
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
18
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
19
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
20
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत

मला पैशांची मागणी केली, डिसले गुरुजी ZP चा राजीनामा देण्याच्या मनस्थितीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2022 12:41 IST

शाळेसाठी तुम्ही काय केले, ग्लोबल टीचर डिसले गुरूजींना सवाल’ या मथळ्याखाली शुक्रवारी ‘लोकमत’मध्ये ठळकपणे वृत्त प्रसिद्ध झाल्यावर राज्यभरात हा विषय चर्चेचा झाला.

सोलापूर : माढा तालुक्यातील परितेवाडी जिल्हा परिषद शाळेचे ग्लोबल टीचर रणजित डिसले यांच्याविरूद्ध अकरा महिन्यापूर्वी चौकशी समितीने सादर केलेला अहवाल मान्य करण्यात आला असून, त्यांच्याविरूद्ध शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करण्यात आली आहे अशी माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिली. तर, प्रशासनाकडून मला मानसिक त्रास देण्यात येत असल्याचे डिसले गुरुजींनी म्हटले आहे. त्यातूनच, नोकरी सोडण्याचा विचार करत असल्याचेही ते म्हणाले.

‘शाळेसाठी तुम्ही काय केले, ग्लोबल टीचर डिसले गुरूजींना सवाल’ या मथळ्याखाली शुक्रवारी ‘लोकमत’मध्ये ठळकपणे वृत्त प्रसिद्ध झाल्यावर राज्यभरात हा विषय चर्चेचा झाला. अमेरिकेत पीएचडी मिळविण्यासाठी गुरूवारी डिसले गुरूजी जिल्हा परिषदेत आले होते. रजेसाठी अर्ज समोर ठेवल्यानंतर शिक्षणाधिकारी लोहार यांनी त्यांना शाळेसाठी काय केले असा सवाल केला. पीएचडीसाठी विहित नमुन्यात मुख्याध्यापकांकडे अर्ज सादर करा असे सांगून परत पाठविले होते. हे वृत्त प्रसिद्ध होताच सोशल मीडियावर हा विषय चर्चेचा झाला. काही जणांनी या प्रकाराचा निषेध केला तर काही जणांनी यामागे नेमके कारण आहे तरी काय असे प्रश्न उपस्थित केले.

याबाबत शिक्षणाधिकारी लोहार यांच्याशी संवाद साधल्यावर त्यांनी स्पष्टीकरण दिले. ग्लोबल टीचर डिसले गुरूजी यांच्या पुरस्काराबाबत लेखी तक्रार आली होती. या तक्रारीवरून कुर्डुुवाडी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी मारूती फडके यांच्यासह विस्तार अधिकारी उमा साळुंके, सुभाष दाढे, मुख्याध्यापक रामेश्वर लोंढे, विस्तार अधिकारी बंडू शिंदे या पाच जणांची चौकशी समिती नियुक्त केली होती. या समितीने २५ मार्च २०२१ रोजी अहवाल सादर केला. यात समितीने सहा मुद्यांवर चौकशी केली. 

ग्लोबल पुरस्कार मिळाल्याचे जाहीर केल्यावर जिल्ह्यातील इतर शिक्षकांना प्रशिपण देण्यासाठी त्यांना जिल्हा प्रशिक्षण संस्थेकडे प्रतिनियुक्ती देण्यात आली. त्यानंतर त्यांना मुदतवाढ दिली. पण या काळात ते या संस्थेकडेही हजर नव्हते, असे या संस्थेने कळविले आहे. त्यानंतर परितेवाडी शाळेत रुजू झाल्यानंतर तीन वर्षे ते कामावर हजर झालेच नाहीत, असे चौकशी समितीने अहवालात नमूद केले आहे.

राठोड यांचा चर्चेचा शेरातत्कालीन शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांच्याकडे चौकशी समितीने अहवाल दिल्यावर त्यांनी यावर चर्चा करा, असा दोन वेळा शेरा मारला. त्यामुळे हा चौकशी अहवाल प्रलंबित राहिला. लोहार यांनी पदभार स्वीकारल्यावर ही फाइल त्यांच्यासमोर आली. त्यांनी चौकशी समितीचा अहवाल मान्य केला आहे.

काम न करताच घेतला पगारडिसले गुरुजी तीन वर्षे विनापरवानगी शाळेवर गैरहजर राहिले. तक्रार आल्यावर चार महिन्यांचा पगार थांबविला होता; पण तीन वर्षे काम न करताच त्यांनी पगार उचलला. त्यामुळे शिस्तभंगाची कारवाई करा, असा प्रस्ताव सादर करण्यात येत असल्याचे शिक्षणाधिकारी डॉ. लोहार यांनी सांगितले.

डिसले गुरूजींनी पुरस्कारासाठी नामांकन सादर करण्यासाठी कार्यालयाची परवानगी घेतली नाही. पुरस्काराबाबत ज्या संस्थेशी पत्रव्यवहार झाला, ईमेल, पुरस्कार मिळाल्यानंतरचे छायाचित्र, व्हिडीओ क्लिप सादर करण्यास नकार दिला. क्युआर कोड पुस्तकांचा प्रकल्प टोराॅन्टो (कॅनडा) येथे सादर करण्यास दहा दिवसाची रजा मंजूर केली होती. या व्यतिरिक्त त्यांना कोणतीही रजा मंजूर नाही, असे चौकशी समितीने अहवालात नमूद केले आहे.

मला पैसे मागितले, नोकरी सोडणार

मी दिलेला रजेचा अर्ज गेल्या दीड महिन्यांपासून प्रलंतिब ठेवण्यात आला. यासाठी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांकडून मला त्रास देण्यात आला. पैशाची मागणीही करण्यात आल्याचा आरोप डिसले गुरुजींनी केला आहे. रजा न मिळाल्याने माझ्या हातून फुलब्राइट स्कॉलरशीप जाण्याची भीती आहे. शिक्षण विभागाकडून देण्यात येणारा हा त्रास पाहून गुरुजीची नोकरी सोडण्याची आता माझी मानसिकता बनली आहे, असेही डिसले गुरुजींनी लोकमतशी बोलताना म्हटले. 

चौकशी समितीचे आरोपरही डिसले गुरुजींनी फेटाळले आहेत. याबाबत दोन पानी दिलेल्या पत्रात त्यांनी, ग्लोबल पुरस्काराने कामाची व्याप्ती वाढली, केवळ जिल्हा नव्हे तर राज्यभर मार्गदर्शन करण्याची जबाबदारी पार पाडली, असे गुरुजींनी नमूद केले आहे.   

टॅग्स :Ranjitsinh Disaleरणजितसिंह डिसलेMumbaiमुंबईSolapurसोलापूरEducationशिक्षण