शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
4
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
5
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
6
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
7
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
8
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
9
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
10
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
11
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
12
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
13
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
14
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
15
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
16
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
17
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
18
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
19
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
20
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
Daily Top 2Weekly Top 5

स्वार्थ काहीच नव्हता, शहरासाठी झटलो

By admin | Updated: June 26, 2014 01:28 IST

आयुक्त गुडेवार: नगरोत्थान रस्ते रद्द केल्यामुळे ५० कोटी वाचले

सोलापूर: माझा स्वार्थ काहीच नव्हता, शहरासाठी काम केले़ शहरातील ११ महिन्यांतील सेवा इतिहासात नोंद करण्यासारखी आहे़ शहरवासीयांनी खूप प्रेम केले़ काही कटू निर्णय घेतल्यामुळे काही जण नाराज होणार हे माहीत होते़ नगरोत्थान रस्ते योजनेतील २३८ कोटींचे टेंडर रद्द करण्याचा निर्णय घेतल्यामुळे मनपाचे ५० कोटी रुपये वाचले़ हा निर्णय मला अडचणीचा ठरणार असे दिसले होते तरीही मी शहराचे हित पाहिले, असे मत आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी व्यक्त केले़नगरोत्थान रस्ते कामाचे २३८ कोटींचे टेंडर युनिटी इन्फ्रा यांना दिले होते़ मनपाकडून अतिक्रमण काढणे होत नाही, भूसंपादन होत नाही, जलवाहिनी शिप्ट करणे, पोल शिप्ट करणे वेळेत होत नसल्यामुळे रस्त्याची ही कामे रखडली आहेत त्यामुळे काही काम नसताना मक्तेदाराला प्राईस एक्सलेशनचा लाभ द्यावा लागत होता त्यामुळे १५ आॅगस्टपर्यंत सध्याची सुरू कामे संपवून नवीन कोणतीही कामे घेऊ नयेत असे सुचविले आहे़ रस्त्याचे हे टेंडर रद्द केल्याचे आयुक्त म्हणाले़ उर्वरित कामे पुन्हा रिटेंडर काढून केली जातील यामुळे मनपाचा किमान ५० कोटींचा फायदा होईल असेही गुडेवार म्हणाले़ दोन दिवसांच्या बैठकानंतर गुडेवार बुधवारी दुपारी शहरात आले होते़ महापालिकेत न येता त्यांनी निवासस्थानी बसून अनेक फाईलींचा निपटारा केला़ गेल्या ११ महिन्यात अनेक कामे करता आली; मात्र पाणीपुरवठा सुरळीत करणे आणि १०० कोटींचे थीर्म पार्क उभारणे हे काम राहून गेले़ शहराचा सर्वंकष वाहतूक आराखडा तयार करण्यास केंद्राने मंजुरी दिली असून तसे मत्र मनपाला प्राप्त झाल्याचे आयुक्त म्हणाले़ माझ्या अनेकवेळा बदल्या झाल्या आहेत़ एक वर्षात मी तीन वर्षाएवढे काम केले आहे़ बदलीमुळे कौटुंबिक त्रास होतो असे ते म्हणाले़ मी पुण्याला बदली मागितली असून शासन लवकरच याबाबत निर्णय घेईल असे ते म्हणाले़-----------------------गुडेवारांसाठी आज सोलापूर बंदसोलापूर: महापालिकेचे आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांची वर्षभरात झालेली बदली रद्द करावी, या मागणीसाठी गुरुवारी सत्ताधारी पक्ष वगळता सर्व विरोधकांनी सोलापूर बंद जाहीर केला आहे़ बंदची जोरदार तयारी केली असून, दोन्ही मोर्चे जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणार आहेत़ दिवसभर बाजारपेठा बंद ठेवल्या जाणार आहेत़ हा बंद मोडून काढा, असे आवाहन काँग्रेसने केल्यामुळे बंद कितपत यशस्वी होतो, याकडे लक्ष लागले आहे़ एस़ टी़ स्टॅण्ड तसेच शिवाजी चौक परिसर १०० टक्के बंद ठेवणार असून, गुडेवार यांची बदली रद्द करण्यासाठी शहरवासीयांनी आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन बसपाचे गटनेते आनंद चंदनशिवे यांनी केले आहे़ शिवाजी चौकातून दत्त चौक येथे कार्यकर्ते मोर्चाद्वारे सकाळी १० वाजता येतील तर पूर्व भागातून कामगार नेते आडम मास्तर दत्त चौक येथे येतील़ मेकॅनिकी चौकातून दोन्हीही मोर्चे विविध पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते एकत्रितपणे जिल्हाधिकारी कार्यालयावर काढून गुडेवारांची बदली रद्द करावी, यासाठी निवेदन देतील अशी माहिती चंदनशिवे यांनी दिली़ -------------------------बंदमध्ये कारखानदार आणि विडी कारखानेआयुक्तगुडेवार यांच्यामुळे शहरात अनेक चांगले बदल होत आहेत़ त्यांनी मनपाचे उत्पन्न वाढविण्यासाठी तसेच शहरात मूलभूत सुविधा करण्यासाठी खूप प्रयत्न केले़ त्यांच्यासाठी पूर्व भागातील यंत्रमाग कारखाने आणि विडी कारखाने देखील बंद ठेवण्याचा निर्णय कारखानदारांनी घेतला असल्याचे आडम मास्तर यांनी सांगितले़-------------------------नागरिकांनी सामील व्हावे़सत्ताधारी पक्षातील काहींंनी गुडेवारांच्या बदलीसाठी मुख्यमंत्र्यांवर दबाव टाकला, त्यामुळे चांगल्या अधिकाऱ्याला शहर मुकले आहे़ त्यांच्या पाठीशी राहण्यासाठी सोलापूर बंदची गुरुवारी हाक दिली आहे़ नागरिकांनी यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे आणि हा निर्णय हाणून पाडावा,असे आवाहन आ़ विजयकुमार देशमुख, आडम मास्तर, प्रताप चव्हाण, आनंद चंदनशिवे आदींनी केले आहे़------------------------येणे लांबणीवरगुडेवार यांची बदली रद्द व्हावी या मागणीसाठी शहरात आंदोलने सुरू झाली आहेत़ गुरुवारी सोलापूर बंदची हाक दिली आहे त्यामुळे नवे आयुक्त अजित जाधव यांचे येणे लांबणीवर पडले आहे़ बदलीला स्थगिती मिळविण्यासाठी विरोधक प्रयत्नशील आहेत़ गुडेवार दोन दिवस तरी सोलापुरातच असून त्यांनी कामकाज सुरू ठेवले आहे़