शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

अक्कलकोट तालुक्यात उसाची चोरी ; अंधारात ऊस पोहोचतोय रसपानगृहावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 12:43 IST

शिवानंद फुलारी ।  अक्कलकोट : ऊस उत्पादक शेतकºयांनो सावधान! काही ऊस वाहतूक चालक रात्रीच्या वेळी रसपानगृहधारकांना चोरून ऊस विक्री ...

ठळक मुद्देरोज हजारो रुपयांच्या उसाची चोरीशेतकºयांना लावला जातो चुनाशेतकºयांच्या मालाच्या चोरीचा हा नवा प्रकार सर्वांनाच अचंबित करणारा

शिवानंद फुलारी । 

अक्कलकोट : ऊस उत्पादक शेतकºयांनो सावधान! काही ऊस वाहतूक चालक रात्रीच्या वेळी रसपानगृहधारकांना चोरून ऊस विक्री करीत आहेत. रविवारी रात्री साडेनऊ वाजता अक्कलकोट-सोलापूर रस्त्यावर डॉ.बंदीछोडे हॉस्पिटलजवळ हा प्रकार उघडकीस आला.गेल्या दोन महिन्यांपासून साखर कारखान्यांचे गाळप चालू आहे.

प्रत्येक तालुक्यात विविध कारखान्यांसाठी ऊसतोडणी जोमाने चालू आहे. अक्कलकोट तालुक्यातून रोज शंभरावर गाड्या विविध कारखान्यांना गाळपासाठी जातात. दिवसभर ऊस तोडून रात्री सर्व गाड्या आपापल्या कारखान्याकडे ऊस घेऊन जातात. अशाच प्रकारे बोरी उमरगे येथून पाटील नावाच्या शेतकºयाच्या शेतातून एम एच-१३-ए जी-५२२८ हा ट्रॅक्टर दोन ट्रॉली जोडून जयहिंद कारखान्याकडे गाळपासाठी निघाला होता. दरम्यान, अक्कलकोट-सोलापूर रस्त्यावरील डॉ.बंदीछोडे दवाखान्याजवळ अंधारात ट्रॅक्टरचालकाने रस्त्याच्या कडेला वाहन थांबवले होते.

सुमारे क्विंटलभर ऊस खाली उतरविल्यावर एका पंचवीस वर्षीय तरूणाने एका मुलीची मदत घेऊन वाहनातून ऊस घेऊन गेला. हा सर्व प्रकार सांगवी बु़ येथील मल्लिकार्जुन घोडके या युवकाने प्रत्यक्ष पाहिला. एवढा ऊस कुठे घेऊन चाललात, असे विचारले असता मी रोज एका ट्रॅक्टरचालकाकडून खरेदीने ऊस घेऊन जात असतो, असे त्याने सांगितले. त्यानंतर त्याने संबंधिताची छायाचित्रेही आपल्या मोबाईलवरून घेतली. मागच्या आठवड्यात किणी, घोळसगाव येथील दोन शेतकºयांनी आपल्या शेतातील ऊस गाडीत भरून कारखान्याकडे पाठविल्यावर फारच कमी ऊस भरले होते. यामागे अशाच प्रकारच्या घटना तर नसाव्यात, अशी शंका आता शेतकरी व्यक्त करीत आहेत. 

एका गाडीमागे दोन क्विंटल- सध्या अक्कलकोट शहर व परिसरात दहा ते पंधरा रसपानगृह आहेत. यापैकी बहुतेक जण अशाच प्रकारे चोरीने ऊस खरेदी करून रसपानगृह चालवितात, असा संशय व्यक्त होत आहे. एका ऊस गाडीमागे किमान एक ते दोन क्विंटल ऊस अशाच प्रकारे विकला जातोे. या माध्यमातून रोज हजारो रुपये ट्रॅक्टरचालक लुटत आहेत. यामुळे शेतकºयांच्या मालाच्या चोरीचा हा नवा प्रकार सर्वांनाच अचंबित करणारा आहे. 

मी बोरी उमरगे येथील पाटील नावाच्या शेतातून ऊस घेऊन जयहिंद साखर कारखान्याला घेऊन जात आहे. मला कबूल केल्याप्रमाणे दर खेपेला दोनशे रुपये दिले नाही म्हणून मी ऊस विकला आहे.- ट्रॅक्टरचालक, एमएच-१३-एजे-५२२८

मी रात्रीच्या वेळी सदर ठिकाणी थांबलो होतो. हा प्रकार बघून संबंधित ट्रॅक्टर चालकास हटकले तरीही त्याने जुमानले नाही. ते ऊस एक मुलगा, एक मुलगी घेऊन गेले. संबंधित ट्रॅक्टरचालकाची छायाचित्रे मी माझ्या मोबाईलमधून घेतली आहेत.- मल्लिकार्जुन घोडके, युवक, सांगवी बु.

टॅग्स :SolapurसोलापूरThiefचोरSugar factoryसाखर कारखाने