पत्नी गेली माहेरी आणि पतीने सवत आणली घरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2023 10:08 IST2023-09-16T10:07:44+5:302023-09-16T10:08:13+5:30

Solapur: लग्नामध्ये मानपान केले नसून, जागा घेण्यासाठी विवाहितेकडे पैशाची मागणी केली. या त्रासाला कंटाळून विवाहित माहेरी आल्यानंतर, पतीने दुसरे लग्न केल्याची तक्रार पत्नीने मंगळवेढा पोलिस ठाण्यात दिली आहे.

The wife went home and the husband brought everything home | पत्नी गेली माहेरी आणि पतीने सवत आणली घरी

पत्नी गेली माहेरी आणि पतीने सवत आणली घरी

मंगळवेढा (जि. सोलापूर) : लग्नामध्ये मानपान केले नसून, जागा घेण्यासाठी विवाहितेकडे पैशाची मागणी केली. या त्रासाला कंटाळून विवाहित माहेरी आल्यानंतर, पतीने दुसरे लग्न केल्याची तक्रार पत्नीने मंगळवेढा पोलिस ठाण्यात दिली आहे.
याबाबत प्रियंका पडोळे (रा. साळमाळगेवाडी, ता. मंगळवेढा) यांनी फिर्याद दिली आहे. यानुसार, प्रदीप पडोळे, अर्चना पडोळे, बाळासाहेब पडोळे, प्रतीक्षा पडोळे (चौघे रा. साळमाळगेवाडी, ता. मंगळवेढा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादीनुसार, प्रियंका आणि प्रदीप यांचे लग्न १७ डिसेंबर २०२० मध्ये झाले होते. लग्नानंतर सासरकडील लोकांनी लग्नामध्ये मानपान केला नाही, तसेच जागा घेण्यासाठी माहेरहून पैसे आण, म्हणून मारहाण केली.

Web Title: The wife went home and the husband brought everything home