विजेचा धक्का लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू; पंढरपूर तालुक्यातील चळे गावातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2022 22:18 IST2022-03-18T22:16:58+5:302022-03-18T22:18:19+5:30
सोलापूर लोकमत ब्रेकिंग

विजेचा धक्का लागून दोघांचा दुर्दैवी मृत्यू; पंढरपूर तालुक्यातील चळे गावातील घटना
सोलापूर : धुलीवंदनाच्या दिवशी नदीत मासे पकडणे दोन युवकांच्या जीवावर बेतले आहे. मासे पकडणाऱ्या युवकांनी एका शेतकऱ्यांने नदीतील मोटार काढण्यास बोलाविले.
मासे पकडण्याचे सोडून आनंदा शिवाजी मोरे (वय ४२) आणि राजू गोविंदा सातपुते (वय ३०)(दोघे रा.चळे ता.पंढरपूर) हे दोघे मदतीसाठी गेले. मोटार काढत असताना मोटारीमध्ये विजेचा प्रवाह असल्याने विजेचा धक्का बसून दोघांचाही जागीच मृत्यू झाला आहे.