शेतीपंपाच्या वीज तोडणीचा संताप; पंंढरपुरातील युवक शेतकऱ्यानं केली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2022 15:09 IST2022-03-04T15:09:31+5:302022-03-04T15:09:37+5:30

सोलापूर लाेकमत ब्रेकिंग

The rage of power outages at agricultural pumps; Young farmer commits suicide in Pandharpur | शेतीपंपाच्या वीज तोडणीचा संताप; पंंढरपुरातील युवक शेतकऱ्यानं केली आत्महत्या

शेतीपंपाच्या वीज तोडणीचा संताप; पंंढरपुरातील युवक शेतकऱ्यानं केली आत्महत्या

पंढरपूर : सध्या ग्रामीण भागात शेतीपंपाची वीजतोडणी मोहिम वेगात सुरू आहे. या वीजतोडणीमुळे शेतातील उभी पिके जळून जात आहेत. या वीज तोडणी व महावितरणच्या मनमानी कारभाराला कंटाळून पंढरपूर तालुक्यातील एका युवा शेतकऱ्याने मरणापूर्वी व्हिडिओ करून आपलं आयुष्य संपविल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

वीज तोडणीचा पंढरपूर तालुक्यात पहिला बळी गेला आहे. सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाला कंटाळून व वारंवार वीज तोडणी करून शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या महावितरण वर वैतागून परत शेतकरी जन्माला येणार नाही, असे म्हणून पंढरपूर तालुक्यातील मगरवाडी येथील तरुण सूरज जाधव यांनी आत्महत्या केली.

Web Title: The rage of power outages at agricultural pumps; Young farmer commits suicide in Pandharpur