भांडण सोडवणाऱ्या वृद्ध पित्याला मुलानं ठोसा मारुन केलं जखमी
By विलास जळकोटकर | Updated: May 15, 2023 17:57 IST2023-05-15T17:57:30+5:302023-05-15T17:57:39+5:30
मुलाविरोधात गुन्हा दाखल.

भांडण सोडवणाऱ्या वृद्ध पित्याला मुलानं ठोसा मारुन केलं जखमी
विलास जळकोटकर
सोलापूर : स्वत:च्या दोन्ही मुलांचे पैशाच्या देवाण-घेवाणीवरुन भांडण सुरु असताना ते सोडवायला मध्ये आलेल्या वडिलांना मध्ये का आला म्हणत दुसऱ्या मुलानं ठोसा मारुन जखमी केले. ही घटना जुना विडी घरकूल परिसरात घडली. या प्रकरणी जखमी मल्लय्या आगय्या यासम (वय- ७०, रा. एफ १२२३, जुना विडी घरकूल) यांनी रविवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यावरुन श्रीनिवास मल्लय्या यासम याच्या विरुद्ध गुन्हा नोंदला आहे.
यातील फिर्यादी मल्लय्या आगय्या स्वामी यांचा मोठा मुलगा विनायक व लहान मुलगा श्रीनिवास यांच्यामध्ये पैसे देण्याघेण्याच्या कारणावरुन २९ एप्रिल रोजी भांडण सुरु होते. फिर्यादी दोघांना समजावून सांगून भांडण सोडवत असताना चिडलेल्या श्रीनिवास याने ‘तू का भांडण सोडवण्यासाठी आला’ म्हणून शिवीगाळ करीत हातानं ठोसा मारुन जखमी केले, असे फिर्यादीत म्हटले आहे.