प्रेयसीला भेटण्यासाठी आलेल्या प्रियकराचे डोके फोडले
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 01:24 IST2025-03-05T01:23:16+5:302025-03-05T01:24:13+5:30
भांडण सोडवण्यासाठी आलेल्या प्रेयसीलाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.

प्रेयसीला भेटण्यासाठी आलेल्या प्रियकराचे डोके फोडले
Solapur Crime: प्रेयसीला भेटण्यासाठी गेलेल्या प्रियकराला दोघांनी मिळून शिवीगाळ, दमदाटी करून लाकडी दांडक्याने डोक्यात मारून गंभीर जखमी केले. यावेळी भांडण सोडवण्यासाठी आलेल्या प्रेयसीलाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. प्रियकराच्या चारचाकी कारची काच फोडून नुकसान केले. ही घटना २४ फेब्रुवारी रोजी दुपारी ३:३० च्या सुमारास सांगोला तालुक्यात येथे घडली होती.
याप्रकरणी भारत भुषारी, समाधान भुषारी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी याचे एका मुलीसोबत प्रेमसंबंध आहेत. दरम्यान, २४ फेब्रुवारी रोजी रात्री १०:३० च्या सुमारास फिर्यादी तिला भेटण्याकरिता तिच्या घरी गेला होता. त्यावेळी तिच्या घरासमोर आरोपींनी 'तू मुलीच्या घरी सारखा का येतोस', असे म्हणून फिर्यादीला शिवीगाळ, दमदाटी करून लाकडी दांडक्याने फिर्यादीच्या डोक्यात डाव्या बाजूला मारून जखमी केले.
यावेळी भांडण सोडवण्याकरिता मधे आलेल्या मुलीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच फिर्यादीच्या कारची काच फोडली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.