फिरस्त्याचा मृत्यू, हिंस्र प्राण्याने तोडले लचके
By रूपेश हेळवे | Updated: June 9, 2023 15:05 IST2023-06-09T15:05:58+5:302023-06-09T15:05:58+5:30
शुक्रवारी सकाळच्या सुमारास घटनास्थळी घाण वास येत असल्याने काही नागरिकांनी पहाणी केल्यानंतर त्यांना एका इसमाचा मृतदेह परिसरात आढळला.

फिरस्त्याचा मृत्यू, हिंस्र प्राण्याने तोडले लचके
सोलापूर : होटगी येथील लघू पाटबंधारे परिसरात शुक्रवारी सकाळी एका अनोळखी फिरस्त्याचा मृतदेह आढळून आला. त्याच्या जवळ काही चिल्लर रक्कम आढळली. तर त्याच्या शरीराचा काही भाग हिंस्र प्राण्याने खाल्लेला होता. दरम्यान, वळसंग पोलिसांनी त्याला छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.
शुक्रवारी सकाळच्या सुमारास घटनास्थळी घाण वास येत असल्याने काही नागरिकांनी पहाणी केल्यानंतर त्यांना एका इसमाचा मृतदेह परिसरात आढळला. यामुळे नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनेचा माहिती कळताच वळसंगचे ए. एस. आय. राजशेखर निंबाळे, पोलिस नाईक बाबा मुल्ला हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी रुग्णसेवक लादेनच्या मदतीने त्या इसमाला छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.