"मुख्यमंत्र्यांनी कामाला लागावे, पूजा अर्चा करण्यासाठी एक स्वतंत्र मंत्री नेमावा", जयंत पाटील यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2022 22:53 IST2022-08-12T22:51:38+5:302022-08-12T22:53:30+5:30
Jayant Patil: मुख्यमंत्र्यांनी पूजा-अर्चा करण्याची जबाबदारी इतरांवर द्यावी. त्यासाठी एक स्वतंत्र मंत्री नेमावा, अशी टीका राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली.

"मुख्यमंत्र्यांनी कामाला लागावे, पूजा अर्चा करण्यासाठी एक स्वतंत्र मंत्री नेमावा", जयंत पाटील यांची टीका
-राकेश कदम
साेलापूर - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता लवकर कामाला लागले पाहिजे. देव-धर्म,पूजा अर्चा करण्यातच त्यांचा जास्त वेळ जाताेय. पूजा-अर्चा करण्याची जबाबदारी इतरांवर द्यावी. त्यासाठी एक स्वतंत्र मंत्री नेमावा, अशी टीका राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केली.
पाटील म्हणाले, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार आता स्थिर झाले पाहिजे. शिंदे यांना मी ओळखताे. ते काम करतात. ते कष्ट करतात. पण सरकार चालवणे वेगळे आणि एखाद्याला फाेन करुन पाेलिस स्टेशनमधून साेडा म्हणणे वेगळे. आता त्यांनी शासनातील वेगवेगळ्या विभागांना भेटी दिल्या पाहिजेत. मी असे म्हणत नाही की ते करू शकणार नाहीत. पण त्यांनी या कामाकडे लक्ष दिले पाहिजे. पूजा-अर्चा करण्यात त्यांचा वेळ जाताेय.