शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
2
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
3
अब की बार, देश में जनता की सरकार; महाराष्ट्रात करोडो रुपयांना आमदारांची खरेदी, पक्षांतराचा पायंडा पाडला : प्रियंका गांधी
4
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
5
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
6
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
7
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
8
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
9
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
10
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
11
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
12
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
13
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
14
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
15
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
16
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
17
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
18
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
19
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
20
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका

टेंभुर्णी येथे धाडसी दरोडा, एका बंदुकासह १० काडतुसे चोरी, पोलीसांचा तपास सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 2:44 PM

मागील वषार्पून झालेल्या  एकाही चोरीचा शोध लावण्यात टेंभुर्णी पोलीसांना यश आलेले नाही. या मुळे पोलिसांच्या कामकाजाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. चोरीच्या अनेक घटनांची नोंद करण्यासही पोलीस टाळाटाळ करत असल्यांची लोकांची तक्रार आहे.

ठळक मुद्देटेभुर्णी शहरातही दर आठ-दहा दिवसाला चोरीच्या लहान मोठ्या घटना घडत आहेत मागील वषार्पून झालेल्या  एकाही चोरीचा शोध लावण्यात टेंभुर्णी पोलीसांना यश

आॅनलाइन लोकमत सोलापूरटेंभुर्णी दि १६ : टेंभुर्णी पोलीस स्टेशन हद्दीतील कन्हेरगाव (ता.माढा) येथील वस्तीवर राहणाºया मनोहर वागज व दत्तात्रय भरगंडे यांच्या घरावर धाडसी दरोडा टाकला़ या धाडीत अज्ञात चार चोरट्यांनी दहा काडतुसासह एक बंदुक व  सोन्याचे दागिने व रोख रक्कम असे मिळून ६५ हजार रूपयांचा मुदेमाल चोरून नेला आहे. ही घटना  सोमवारी मध्यरात्रीनंतर घडली.सदर घटनेची फिर्याद मनोहर विठोबा वागज यांनी टेभुर्णी पोलिस ठाण्यात दिली आहे़ याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास मनोहर वागज यांना शेजारी राहणाºया दतात्रेय भरगंडे यांच्या  घराच्या पत्र्याचा आवाज आला, म्हणून वागज यांनी भरगंडे यांना आवाज दिला परंतु भरगंडे यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही़ यानंतर  वागज यांनी घराचा दरवाजा उघडून बाहेर येण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांच्या घराचा दरवाजा बाहेरून कडी लावून बंद केला होता. वागज यांनी पुन्हा शेजारी राहणाºया मुलास फोन लावला परंतु तो झोपेत असल्याने त्याने फोन घेतला नाही. वागज यांनी पुन्हा भरगंडे यांना आवाज दिला तेव्हा भरगंडे आलो आलो  म्हणाले व त्यांनी वागज यांच्या घराचा दरवाजा उघडला याचवेळी दबा धरून बसलेल्या चार चोरट्यांनी वागज यांच्या घरात प्रवेश केला. एकाने वागज यांना दम  देवून दागिने व पैसे कोठे आहेत याची चौकशी केल़ बाकीच्या तिघांनी घरात पैसे व दागिन्यांची शोधाशोध चालू केली़ यावेळी चोरटयांनी वागज यांच्या कपाटातील दहा हजार रुपये रोख रक्कम,पत्नीच्या गळयातील दहा ग्रॅमचे मणीमंगळसूत्र व चार ग्रामचे कानातील सोन्याची फुले , बारा बोअरची बंदूक,  दहा काडतूसे असा एकूण ५५हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी पळवून नेला.जाताना चोरांनी वागज पती पत्नी व दत्तात्रय भरगंडे यांना घरास बाहेरूण कडी लावून कोंडून ठेवले. नंतर आरडा ओरडा झाल्यावर भरगंडे यांच्या रेष्मा नावाच्या मुलीने वागज यांच्या घराची कडी काढून वागज पती पत्नि व भरगंडे यांची सुटका केली. यानंतर भरगंडे यांनी सांगीतले की त्या चार चोरट्यांनी आगोदर आनच्या घरात प्रवेश केला  व मला दगडाने डोक्यात मरून जखमी केले.पँटच्या खिशातील५०००रू. रोख, पत्निच्या गळ्यातील पाच ग्रॉंमचे मनीमंगळसूत्र असे एकूण १५००० रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला.मागील आठवड्यात टेंभुर्णी  येथे टायरचे शोरूम फोडून चार लाखाची चोरी झाल्याची घटना ताजी असतानाच चोरट्यांनी आतातर बंदूकच पळवून नेल्याने टेंभुर्णी शहर व परीसरात भितिचे वातावरण पसरले आहे. टेभुर्णी शहरातही दर आठ-दहा दिवसाला चोरीच्या लहान मोठ्या घटना घडत आहेत. मागील वषार्पून झालेल्या  एकाही चोरीचा शोध लावण्यात टेंभुर्णी पोलीसांना यश आलेले नाही. या मुळे पोलिसांच्या कामकाजाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. चोरीच्या अनेक घटनांची नोंद करण्यासही पोलीस टाळाटाळ करत असल्यांची लोकांची तक्रार आहे.

टॅग्स :SolapurसोलापूरThiefचोर