शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांचे कोरोना चाचणी अहवाल रखडले;  शाळा सुरू होण्याला आता उरले काही तास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 26, 2021 18:00 IST

सोलापूर लोकमत ब्रेकिंग

सोलापूर: शिक्षण विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार पाचवी ते आठवी शाळा सुरू करण्याला आता काही तास उरले असताना जिल्ह्यातील अनेक शिक्षकांच्या कोरोना चाचण्यांचा अहवाल रखडला आहे.

जिल्हा आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार सोमवारी सायंकाळी 8 हजार 632 शिक्षकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. यामध्ये 1हजार 910 रॅपिड कीटद्वारे तपासण्या करण्यात आल्या, यात पाच शिक्षक पॉझिटिव्ह आले आहेत. 6 हजार 722 प्रयोगशाळेच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये दोन शिक्षक पॉझिटिव्ह आले आहेत. प्रयोगशाळेचे अनेक अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.

तालुकानिहाय झालेल्या चाचण्या व पॉझिटिव्ह अहवाल पुढील प्रमाणे आहेत. अक्कलकोट: 759 ( पॉझिटिव्ह:0), बार्शी:1182 (1), करमाळा: 291 (0), माढा: 637 (0), मोहोळ: 864 (1), माळशिरस: 819 (0), मंगळवेढा: 521 (1), उत्तर सोलापूर: 329 (0), पंढरपूर: 1032 (३), सांगोला: 1415 (1), दक्षिण सोलापूर: 783 (0).  शाळा सुरू करण्यासाठी शिक्षकांच्या चाचण्या वाढल्यामुळे प्रयोगशाळेत एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणावर चाचण्यांचे अहवाल येऊ शकलेले नाहीत. त्यामुळे ज्या शिक्षकांचा अहवाल आला त्याच शिक्षकांना बुधवारी शाळेवर हजर राहता येणार आहे. शाळा सुरू करण्यासाठी 50% शिक्षकांची उपस्थिती आवश्यक असल्याने बऱ्याच शिक्षकांच्या एंटीजन चाचण्याही करण्यात येत आहेत. माध्यमिक शाळा प्रमाणे प्राथमिक शाळा सुरू करण्याची तयारी पूर्ण झाली आहे बुधवारी दहा महिन्यानंतर उघडण्यात येणार्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद शाळांमधील तयारीचा मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांच्याकडून आढावा घेतला आहे. शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये उत्साह असल्याचे वातावरण आहे.

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याSchoolशाळाEducationशिक्षण