शहरं
Join us  
Trending Stories
1
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
2
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
3
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
4
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
5
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
6
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
7
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
8
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
9
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
10
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
11
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
12
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
13
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
14
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
15
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
16
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
17
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
18
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
19
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
20
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!

सोलापूर जिल्ह्यातील स्वच्छ ग्राम स्पर्धेत तावशी ग्रामपंचायत प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 1:04 PM

सोलापूर : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत जिल्हास्तरावर तावशी (ता. पंढरपूर) ग्रामपंचायतीने प्रथम, ब्रह्मपुरी (ता. मंगळवेढा) द्वितीय तर सरफडोह (ता. करमाळा) ग्रामपंचायतीने तृतीय क्रमांक पटकावला आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी सोमवारी पुरस्कार पटकावणाºया ग्रामपंचायतींची यादी जाहीर ...

ठळक मुद्देजिल्हास्तरीय समितीने नुकतीच ग्रामपंचायतींची तपासणी केलीतावशी ग्रामपंचायतीला प्रथम क्रमांकासाठी पाच लाख रुपयेअजनाळे, देगाव, कारकल ग्रामपंचायतीला विशेष पुरस्कार

सोलापूर : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेत जिल्हास्तरावर तावशी (ता. पंढरपूर) ग्रामपंचायतीने प्रथम, ब्रह्मपुरी (ता. मंगळवेढा) द्वितीय तर सरफडोह (ता. करमाळा) ग्रामपंचायतीने तृतीय क्रमांक पटकावला आहे. 

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी सोमवारी पुरस्कार पटकावणाºया ग्रामपंचायतींची यादी जाहीर केली. २०१७-१८ मधील संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेसाठी जिल्हास्तरीय समितीने नुकतीच ग्रामपंचायतींची तपासणी केली. तावशी ग्रामपंचायतीला प्रथम क्रमांकासाठी पाच लाख रुपये , ब्रह्मपुरीला तीन लाख रुपये, सरफडोह ग्रामपंचायतीला दोन लाखांचे बक्षीस मिळणार आहे.

अजनाळे, देगाव, कारकलला विशेष पुरस्कार- जिल्हास्तरीय विशेष पुरस्कारप्राप्त ग्रामपंचायतींची यादी जाहीर करण्यात आली. यात पाणी गुणवत्ता, पिण्याचे पाणी व पाणी व्यवस्थापनचा स्व.वसंतराव नाईक पुरस्कार अजनाळे (ता. सांगोला) ग्रामपंचायतीला, कुटुंबकल्याण कार्यक्रमासाठी स्व.आबासाहेब खेडकर स्मृती पुरस्कार देगाव (ता. मंगळवेढा) आणि सामाजिक एकता व लोकसहभागासाठीचा डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार कारकल (ता. दक्षिण सोलापूर) ग्रामपंचायतीला जाहीर झाला आहे.  या ग्रामपंचायतींना प्रत्येकी २५ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येईल.

तालुकास्तरावरील विजेत्या ग्रामपंचायती

  • - या ग्रामस्वच्छता अभियानात तालुकास्तरावर तीन ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली. यात एक लाख, ५० हजार आणि २५ हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येईल. बक्षीस पटकावणाºया ग्रामपंचायतींची क्रमवार नावे
  • - अक्कलकोट : गौडगाव बु., चपळगाव- समर्थनगर. 
  • - बार्शी : शिराळे, जोतिबाचीवाडी, शेळगाव आर. 
  • - करमाळा : सोगाव प., सरफडोह, श्रीदेवीचामाळ. 
  • - माढा : वेणेगाव, आकुलगाव, शिराळ टें. 
  • - माळशिरस : रेडे, मोरोची, मोटेवाडी मा. 
  • - मंगळवेढा : ब्रह्मपुरी, देगाव, गणेशवाडी , 
  • - मोहोळ : ढोकबाभुळगाव, पाटकुल, वडवळ. 
  • - पंढरपूर : वाखरी, तावशी, व्होळे. सांगोला : अजनाळे, यलमार मंगेवाडी, चिणके. 
  • - उत्तर सोलापूर : हिरज, पाकणी, सेवालालनगर. 
  • - दक्षिण सोलापूर : कारकल, वरळेगाव, फताटेवाडी.
टॅग्स :SolapurसोलापूरSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषद