सोलापूरच्या शिवसेनेत भूकंप...ठोंगे-पाटील गेले बरडे आले !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 10:47 IST2020-01-11T10:42:53+5:302020-01-11T10:47:21+5:30

तानाजी सावंताचाही आज निर्णय; दुपारी मुंबईत बैठक

Tanaji Sawant dismisses Sena's sting, supporter; District head in charge of Purushottam Barde | सोलापूरच्या शिवसेनेत भूकंप...ठोंगे-पाटील गेले बरडे आले !

सोलापूरच्या शिवसेनेत भूकंप...ठोंगे-पाटील गेले बरडे आले !

ठळक मुद्दे- सोलापुरातील शिवसेनेचे पदाधिकारी मुंबईत- मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी होणार चर्चा- सोलापूर जिल्ह्यात शिवसेनेच्या पदाधिकाºयांची होणार खांदेपालट

सोलापूर : उस्मानाबाद जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीत शिवसेनेचे नेते डॉ. तानाजी सावंत यांनी महाविकास आघाडीऐवजी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्याचे पडसाद सोलापूर जिल्हा शिवसेनेत उमटले आहेत. 
तानाजी सावंत यांचे समर्थक आणि शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील यांची सेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. शिवसेनेच्या प्रभारी जिल्हाप्रमुखपदी पुरुषोत्तम बरडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उस्मानाबादमध्ये घडलेल्या घडामोडींवर चर्चा करण्यासाठी शनिवारी मातोश्रीवर बैठक आयोजित करण्यात आली आहे.

या बैठकीला सोलापूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील शिवसेनेच्या पदाधिकाºयांना बोलावण्यात आले आहे. तानाजी सावंत या बैठकीला जातात की नाही याकडे लक्ष असणार आहे.


 

Web Title: Tanaji Sawant dismisses Sena's sting, supporter; District head in charge of Purushottam Barde