तानाजी सावंत यांचा सोलापुरात राष्ट्रवादीला आणखी एक धक्का, माजी उपमहापौरांचा आज बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2022 09:38 IST2022-11-16T09:37:07+5:302022-11-16T09:38:14+5:30

राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोलापुरात आणखी एक धक्का दिला आहे.

Tanaji Sawant another blow to nationalists in Solapur former Deputy Mayor Balasaheb's entry into Shiv Sena today | तानाजी सावंत यांचा सोलापुरात राष्ट्रवादीला आणखी एक धक्का, माजी उपमहापौरांचा आज बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश

तानाजी सावंत यांचा सोलापुरात राष्ट्रवादीला आणखी एक धक्का, माजी उपमहापौरांचा आज बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश

राकेश कदम

सोलापूर :

राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोलापुरात आणखी एक धक्का दिला आहे. राष्ट्रवादीचे नेते तथा माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांच्यासह 25 कार्यकर्ते बुधवारी सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहेत.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष संघटनेत पडझड सुरू आहे. दिलीप कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जात होते. सोलापुरातील मरिआई वस्ती भागात कोल्हे यांची चाळ आहे. या चाळीच्या पुनर्विकासाच्या निमित्ताने कोल्हे यांनी सावंत यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर त्यांचा शिंदे गटातील प्रवेश निश्चित झाला होता. या पक्षप्रवेशाचा मुहूर्त बुधवारी सायंकाळी मुंबईतील वर्षा बंगल्यावर निश्चित झाला. कोल्हे आणि कार्यकर्ते बुधवारी सकाळी आठ वाजता मुंबईकडे रवाना झाले.

Web Title: Tanaji Sawant another blow to nationalists in Solapur former Deputy Mayor Balasaheb's entry into Shiv Sena today