शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
2
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधार्‍यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
3
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
4
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
5
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
6
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
7
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
8
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
9
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
10
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
11
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
12
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
13
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
14
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
15
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
16
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
17
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
18
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
19
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
20
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?

दिवाळीत फुप्फुसाची घ्या सर्वात जास्त काळजी; फटाके, धुरापासून दूर राहा

By appasaheb.patil | Updated: October 20, 2022 16:25 IST

पेंटिंगच्या वासाचाही धोका; कायमचे किंवा तात्पुरते बहिरेपण येऊ शकते

सोलापूर : दिवाळी म्हटली की, फटाक्यांची आतषबाजी ही आलीच. त्याचे आकर्षण सर्वांनाच असते. मात्र, फटाके सावधपणे न फोडल्यास मोठी हानी होऊ शकते. फटाक्यांमुळे देशात दरवर्षी सुमारे पाच हजारांवर लोकांची दृष्टी जाते, तर फटाक्यांच्या आवाजामुळे कायमचे किंवा तात्पुरते बहिरेपण येऊ शकते.

दरवर्षी असे सुमारे पाच टक्के रुग्ण कानांच्या गंभीर समस्यांनी त्रस्त होतात. फटाक्यांच्या वायू प्रदूषणामुळे दम्यासह विविध आजारही वाढतात. त्यामुळेच फटाके फोडताय सावधान, असा इशारा डॉक्टरांनी दिला आहे. दिवाळी हा अतिशय व्यस्त आणि तणावाचा काळ असतो. स्वयंपाकघरांमध्ये सतत लगबग सुरू असते. दिवे, रोषणाई केली जाते आणि फटाक्यांची आतषबाजी केली जाते. परंतु साजरीकरणाबरोबरच काही काळजीही घेतली पाहिजे. दिवाळीमध्ये शरीरावर कुठेतरी भाजले जाणे स्वाभाविक असते आणि ही दुखापत सौम्य ते तीव्र स्वरूपाच्या भाजण्याच्या जखमा अशी असू शकते.

---

अचानक फुटणारे फटाके कानासाठी घातक...

आवाजामुळे कानात दडे बसणे, कान दुखणे, डोके दुखणे यांपासून कानाचा पडदा फाटणे, कायमचे किंवा तात्पुरते बहिरेपण येण्यापर्यंतचे त्रास होऊ शकतात. तात्पुरते बहिरेपण आल्यास औषधोपचाराने ते काही दिवसांमध्ये पूर्ववत होऊ शकतात. मात्र, कायमस्वरूपी बहिरेपणही येऊ शकते. त्याच वेळी फटाक्यांच्या रसायनयुक्त धुरामुळे नाक, कान, घसा व फुफ्फुसांमध्ये जंतुसंसर्ग होणे, खाज सुटणे आदी समस्याही निर्माण होतात.

---

फटाके फोडताना काय काळजी घ्याल?

  • - फटाके फोडत असताना ते पेटवल्यावर योग्य अंतर राखा.
  • - जळते फटाके हातात घेऊ नका किंवा हवेत उडवू नका.
  • - फटाक्यांच्या आजूबाजूला लहान मुले वावरत असल्यास लक्ष ठेवणे गरजेचे.
  • - नेहमी पाण्याची बादली जवळ ठेवा.
  • - रस्त्यावर अनेक लोक फटाके उडवत असल्याने हेल्मेट घालावे.
  • - स्वतःच्या मनाने औषधे घेऊ नका किंवा घरात उपलब्ध असलेले ड्रॉप वापरू नका

---

हे प्रथमोपचार करू शकता...

गरम तेल किंवा बाहेरचे घटक डोळ्यात जाणे अशा सौम्य त्रासाच्या बाबतीत पिण्याचे स्वच्छ पाणी मुबलक प्रमाणात डोळ्यावर मारून डोळा पूर्णपणे स्वच्छ धुवावा किंवा कपभर पाणी डोळ्याच्या जवळ ओतत राहा आणि डोळ्यांची सतत उघडझाप करा. डोळ्यात गेलेले बाहेरचे घटक काढून टाकण्यासाठी आणि योग्य औषधे समजून घेण्यासाठी नेत्रचिकित्सकांचा सल्ला घ्या.

---

या लक्षणांकडे दुर्लक्ष नको

हवेतील प्रदूषणामुळे दम लागणे, छातीत टोचल्यासारखे वाटणे, घशात सूज येणे, सर्दी आणि प्रचंड शिंका येणे, जीव घाबरणे, ॲलर्जीक खोकला येणे, छातीत घरघर होणे आदी लक्षणे दिसताच, डॉक्टरांचा सल्ला घ्या. या दिवसांत अस्थमाच्या रुग्णांनी डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे महत्त्वाचे ठरते.

 

टॅग्स :SolapurसोलापूरHealthआरोग्यDiwaliदिवाळी 2022