कालव्याचे पाणी बंद करण्यासाठी स्वाभीमानीचे जलसमाधी आंदोलन
By काशिनाथ वाघमारे | Updated: February 16, 2024 22:04 IST2024-02-16T22:03:23+5:302024-02-16T22:04:06+5:30
यंदा ६६ टक्के भरलेलं धरण आज उजनी धरण वाजा १३ टक्के वरती गेले आहे, हेच पाणी टप्या - टप्या ने शेतकऱ्यांना दिले असते तर उन्हाळ्यात देखील आवर्तन देता आले असते, असा आरोप स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आला.

कालव्याचे पाणी बंद करण्यासाठी स्वाभीमानीचे जलसमाधी आंदोलन
सोलापूर : गेली चार महिने सलग कालव्यातून पाणी सोडल्यामुळे उजनी धरणातील पाणी कमी झाले आहे. कालव्याचे पाणी त्वरीत बंद करावे या मागणीसाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या वतीने १६ फेब्रुवारी रोजी उजनी धरणावर जलसमाधी आंदोलन करण्यात आले. पाणी बंद करण्याचे आश्वासन सायंकाळी ७ वाजता मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
यंदा ६६ टक्के भरलेलं धरण आज उजनी धरण वाजा १३ टक्के वरती गेले आहे, हेच पाणी टप्या - टप्या ने शेतकऱ्यांना दिले असते तर उन्हाळ्यात देखील आवर्तन देता आले असते, असा आरोप स्वाभीमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आला. कालवा सल्लागार समितीच्या बेजबाबदारीमुळे मोठया दुष्काळसदृश्य परिस्थितीला सोलापूर जिल्ह्याला सामोरे जावे लागत आहे असाही आरोप स्वाभीमानी शेतकरी संघटनेने केला आहे. कालव्याचे पाणी बंद करावे म्हणून शुक्रवारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने उजनी धरणात जलसंमाधी आंदोलन केले. यावेळी उजनी धरण व्यवस्थापनाने सायंकाळी ७ वाजता पाणी बंद करण्याचे लेखी पत्र दिले.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रताप पिसाळ, उजनी धरणग्रस्त शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष सुरेश पाटील, संतोष पाटील, संतोष नाईक नवरे, निलेश मेटे, नाना मेटे, महेश स्वामी, बाबासाहेब पानबुडे, राजेंद्र बनसोडे, दिनेश मेटे, कालिदास शिरतोडे, समाधान गवळी, संदीप नगरे, सतीश नगरे, कालिदास शिरतोडे, गणेश जाधव, स्वप्निल कुलते, अजय कांबळे, पिंटू माने, मोहन कळसाईत, हनुमंत लोहार, मच्छिंद्र सलगर उपस्थीत होते.