मोठी बातमी; सोलापुरातील सुशीलकुमार शिंदे यांनी भरले मोफत ५०१ रूपयाचं पेट्रोल
By Appasaheb.patil | Updated: September 4, 2021 16:01 IST2021-09-04T16:00:09+5:302021-09-04T16:01:07+5:30
यशदा युवती फौंडेशनच्या माध्यमातून एक आगळावेगळा उपक्रम राबविला.

मोठी बातमी; सोलापुरातील सुशीलकुमार शिंदे यांनी भरले मोफत ५०१ रूपयाचं पेट्रोल
सोलापूर - आज माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा ८० वा वाढदिवस. या वाढदिवसाचे औचित्य साधून सोलापूर महापालिकेच्या नगरसेविका फिरदोस पटेल यांनी यशदा युवती फौंडेशनच्या माध्यमातून एक आगळावेगळा उपक्रम राबविला. सुशील किंवा सुशीलकुमार नाव असलेल्या व्यक्तीला ५०१ रूपयांचे पेट्रोल मोफत देण्यात आले.
या योजनेचा शुभारंभ काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार प्रकाश यलगुलवार, काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश वाले, गटनेते चेतन नरोटे, नगरसेवक रियाज हुंडेकरी, नगरसेवक फिरदोस पटेल, सामाजिक कार्यकर्ते शौकत पठाण, सोहेल पठाण यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यावेळी सुशीलकुमार माणिकराव शिंदे या सोलापुरातील व्यक्तीने ५०१ रुपयांचे मोफत पेट्रोल भरून उपक्रमात सहभाग नोंदविला.
सकाळी दहा वाजल्यापासून या उपक्रमाला सात रस्ता परिसरातील एका पेट्रोलपंपावर सुरूवात करण्यात आली. मोफत पेट्रोल मिळविण्यासाठी सुशीलकुमार किंवा सुशील हे नाव असणाऱ्या व्यक्तींनी आपले आधारकार्ड सोबत आणले होते. त्यांनतर रीतसर नोंद करून त्याला तत्काळ ५०१ रुपयांचे पेट्रोल भरून देण्यात आले. मोफत पेट्रोल भरण्यासाठी मोठी रांग लागलेली होती.