शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

आमच्या पोटावर पाय देऊन होतोय सुरत-चेन्नई महामार्ग; गडकरींना शेतकऱ्यांचे ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2023 19:46 IST

आम्हाला वाचवा : केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना शेतकऱ्यांनी थेटे केले ट्विट

संताजी शिंदे

सोलापूर : आमच्या पोटावर पाय देऊन सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्ग होत आहे. आम्हाला वाचवा, अशी पोस्ट ट्विटरवरून जमीन गेलेल्या शेतकऱ्यांना थेट केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांना केले आहे. सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड कॉरिडॉर महामार्गाअंतर्गत गेलेल्या शेतजमिनीचा मोबदला अत्यल्प मिळत असल्याने, शेतकरी संतप्त झाले आहेत.

गुजरातमधील सुरतहून थेट चेन्नईला जोडणारा ग्रीनफिल्ड महामार्ग सोलापुरातूनही जात आहे. अहमदनगरच्या सीमेवरून सोलापुरातील बार्शी तालुक्यातील १५, दक्षिण सोलापूर तालुक्यात ४, तर अक्कलकोट तालुक्यातील १६ अशा ३५ गावांतून १५० कि.मी. महामार्ग जात आहे. संपादित होणाऱ्या सर्व जागेची मोजणी पूर्ण झाली आहे, आता संबंधित मालकांना नुकसानभरपाई म्हणून शासनाकडून पैसे दिले जाणार आहेत. जिल्हा प्रशासनाने रेडी रेकनरनुसार संबंधित जमिनींचा दर निश्चित करून, तशा नोटिसा पाठविण्यास सुरुवात केली आहे.

प्राप्त झालेल्या नोटिसीमध्ये जिरायतीसाठी साधारणत: एकरी ४ ते ५ लाख रुपये, तर बागायतीक्षेत्रासाठी अवघे ५ ते ७ लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. ग्रीनफील्डच्या संपादन प्रक्रियेत गेल्या आठवड्यापासून नुकसानभरपाई संदर्भात नोटिसा जारी करण्यात येत आहेत. मात्र जिल्हा प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेला दर पाहून शेतकरी संतप्त होत आहेत. प्रत्येक तालुक्यात ग्रीनफिल्ड संघर्ष समिती स्थापन करण्यात आली आहे. हजारो शेतकरी एकत्र आले आहेत. शेतकरी थेट केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या ट्विटरवर आपल्या भावना पोस्ट करीत आहेत.

शेतकऱ्यांचे आयुष्य बरबाद होत आहे० अक्कलकोट तालुक्यातील ग्रीनफिल्ड संघर्ष समिती चपळगावचे शेतकरी शंभूलिंग अकतनाळ यांनीही ट्विटरवर थेट पोस्ट केले आहे. पोस्टमध्ये त्यांनी साहेब, नमस्कार आपण श्री स्वामी समर्थ महाराजांचे निस्सीम भक्त आहात. अन् याच समर्थांच्या भूमितील भूमिपुत्रांवर अन्याय झालाय. बाधित शेतीच्या मोबदल्यात मिळणाऱ्या तुटपुंज्या मोबदल्यामुळे शेतकऱ्यांचे आयुष्य बरबाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कृपया प्रश्न मार्गी लावावे अशी भावना व्यक्त केली आहे.

टॅग्स :SuratसूरतFarmerशेतकरीNitin Gadkariनितीन गडकरी