शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

ऊसक्षेत्राचा अंदाज नसल्याने राज्यातील गाळप हंगाम स्लो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 10:48 IST

राज्यात १०१ कारखाने सुरू; खाजगी कारखाने सुरू करण्याचे धाडस कारखानदार करेनात

ठळक मुद्देकोल्हापूर (कोल्हापूर,सांगली) विभागातील २९ तर पुणे विभागातील (पुणे, सातारा)२६ कारखाने सुरू सोलापूर विभागातील सोलापूरचे १५ तर व उस्मानाबाद जिल्ह्यातील ३ कारखाने सुरू अहमदनगर विभागातील १४ तर औरंगाबाद विभागातील १२ तसेच नांदेड विभागातील ८ साखर कारखाने सुरू

सोलापूर : डिसेंबर महिन्याचा पहिला पंधरवडा संपत आला तरीही ऊस क्षेत्राचा अंदाज नसल्यामुळे राज्यातील साखर हंगामाने वेग घेतला नाही. आतापर्यंत १०१ कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. उसाच्या टंचाईमुळे सुरू होणाºया साखर कारखान्यांची संख्या यावर्षी कमीच राहणार असली तरी ती किती राहील?, याचा अंदाज साखर आयुक्त कार्यालयाला अद्याप आलेला नाही.

परतीच्या पावसाची संततधार उशिरापर्यंत सुरु राहिल्याने शिवाय दिवाळी व विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीमुळे यावर्षी साखर हंगाम सुरू करण्यास परवानगी उशिराने मिळाली. राज्यात सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्री गटाची बैठक होईल व साखर हंगामाला परवानगी मिळेल असे सांगितले जात होते; मात्र सरकार स्थापन होत नसल्याने २२ डिसेंबरपासून कारखाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली.   बुधवारपर्यंत राज्यात १०१ साखर कारखान्यांनी हंगाम सुरू केला होता.  यामध्ये  सहकारी साखर कारखान्यांची संख्या अधिक आहे. या कारखान्यांनी ६० लाख ८४ हजार मे.टन गाळप केले असून ५५.५१ लाख क्विंटल साखर तयार झाली आहे.

कोल्हापूर पट्ट्यात महापूर तर उर्वरित भागात दुष्काळाची झळ उसाला बसली आहे. त्यामुळे नक्की किती ऊस गाळपाला येणार?, याचा अंदाज साखर कारखानदारांना येत नसल्याने गाळप हंगाम सुरू करण्यास बहुतेक कारखानदार धजत नसल्याचे सांगण्यात आले. कारखाने सुरू करण्यामध्ये सहकारी कारखानदार आघाडीवर असून खासगी कारखाने सुरू करण्याचे धाडस कारखानदार करीत नसल्याचे दिसत आहे. डिसेंबरचा पहिला पंधरवडा संपत आला तरीही कारखान्याचा हंगाम सुरू होण्यास वेग आलेला नाही.

कोल्हापूर, पुणे विभाग आघाडीवर

  • - कोल्हापूर (कोल्हापूर,सांगली) विभागातील २९ तर पुणे विभागातील (पुणे, सातारा)२६ कारखाने सुरू झाले आहेत. सोलापूर विभागातील सोलापूरचे १५ तर व उस्मानाबाद जिल्ह्यातील ३ कारखाने सुरू झाले असल्याचे साखर आयुक्त कार्यालयातून सांगण्यात आले.
  • - अहमदनगर विभागातील १४ तर औरंगाबाद विभागातील १२ तसेच नांदेड विभागातील ८ साखर कारखाने सुरू झाले आहेत. अमरावती विभागातील दोन कारखाने सुरू झाले असून नागपूर विभागातील एकही कारखाना अद्याप सुरू झालेला नाही.

नोंद अवघ्या सात कारखान्यांची - सोलापूर साखर उपसंचालक कार्यालयाच्या माहितीनुसार सोलापूर जिल्ह्यातील १५ व उस्मानाबाद जिल्ह्यातील तीन असे १८ कारखाने सुरू झाले असले तरी सोलापूर जिल्ह्यातील ७ कारखान्यांनीच गाळप अहवाल पाठविला आहे. अन्य ११ कारखान्यांनी अद्याप अहवाल दिलेला नाही. सुरू झालेल्या काही कारखान्यांना आजही पुरेसा ऊस मिळेल की नाही, याचा भरवसा नाही.

टॅग्स :Solapurसोलापूरkolhapurकोल्हापूरSangliसांगलीSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरीagricultureशेती