विद्यार्थिनीची छेड काढली; एकावर गुन्हा

By Admin | Updated: June 12, 2014 01:08 IST2014-06-12T01:07:22+5:302014-06-12T01:08:19+5:30

सोलापूर : महाविद्यालयीन विद्यार्थिनीची छेड काढल्याप्रकरणी राजेश सॅमसंग जंगले (रा. महात्मा फुले झोपडपट्टी, सोलापूर) याच्याविरुद्ध सदर बझार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Student raid; Crime on one | विद्यार्थिनीची छेड काढली; एकावर गुन्हा

विद्यार्थिनीची छेड काढली; एकावर गुन्हा

सोलापूर : महाविद्यालयीन विद्यार्थिनीची छेड काढल्याप्रकरणी राजेश सॅमसंग जंगले (रा. महात्मा फुले झोपडपट्टी, सोलापूर) याच्याविरुद्ध सदर बझार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
यलगुलवार प्रशालेच्या परिसरात राहणारी विद्यार्थिनी बुधवाथरी दुपारी संगणक क्लाससाठी महावीर चौकात आली होती. क्लास आटोपून ती घरी परतत होती. दुपारी साडेबाराच्या सुमारास ती लिटिल फ्लॉवर शाळेसमोरून जात असताना राजेशने तिचा पाठलाग करीत तिची छेडछाड सुरू केली.
दरम्यान, घाबरलेल्या अवस्थेत तिने भावाशी संपर्क साधला. भावाच्या सांगण्यावरून तिने सदर बझार पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद दिली आहे. तपास महिला सपोनि सुर्वे करीत आहेत. याआधी याच आरोपीने छेड काढल्याचे तिने फिर्यादीत म्हटले आहे. 

Web Title: Student raid; Crime on one